Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यात कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्‍वरकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सातारा / प्रतिनिधी : येथील चेतन व्हारायटीच्या प्रांगणात विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने कॉ. प्रभाकर महाबळेश्‍वरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभि

पहिल्याच दिवशी मान्याचीवाडी येथे क्यूआर कोडद्वारे शंभर टक्के कर वसूली
त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका
वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे कोयना विभाग त्रस्त; आजपासून सर्वपक्षीय धरणे आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : येथील चेतन व्हारायटीच्या प्रांगणात विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने कॉ. प्रभाकर महाबळेश्‍वरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिरीष जंगम, मनीषा साळुंखे, श्रीकांत कांबळे दाम्पत्य, प्रा. संजीव बोंडे, मनोज चाकणकर, प्रकाश खटावकर, प्रकाश फरांदे, प्रा. आनंद साठे, मंगल साठे, दत्ता राऊत, परवेज सय्यद, पूजा बनसोडे, मेघराज बनसोडे, संजय नितनवरे, श्रीमती वरपे, श्रीमंत भंडारे, अनिल वीर आदी उपस्थित होते.
सातारा शहर आणि परिसरात आंदोलन म्हटले की, कॉ. महाबळेश्‍वरकर हे समीकरण असायचे. आंदोलनात 5 लोक असोत की 5000. सरांचा उत्साह तेवढाच. खरं तर बंडखोर स्वभावामुळे सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते अकौंटन्सी विषयाचे क्लासेस घेत. त्यामुळे ’सर’ ही ओळख त्यांना कायमची चिकटली. सन 1982 मध्ये रितसर ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. पाणी, घरपट्टी, रस्ते, केरोसीन आणि रेशन पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन अशा जनतेचे प्रश्‍न घेऊन ते प्रशासनाला भिडले आणि कम्युनिस्ट म्हणूनच घडले. सातारच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी श्री. छ. प्रतापसिंह भोसले यांच्या विरोधात लढली होती. त्यांना सुमारे चार हजार मते पडली. पण, महाराष्ट्र टाइम्सने अग्रलेख लिहून त्यांची दखल घेतली. त्यांची गोरगरीबांसाठीची तळमळ आणि संघर्षाची जबरदस्त उर्मी कार्यकर्त्यांनी अनुभवलेली आहे. जागतिकीकरण विरोधी आंदोलनात सर, कॉ. सयाजीराव पाटील, डी. व्ही. पाटील, भाऊसाहेब देसाई आणि नागनाथअण्णा नायकवडी या दिग्गज मंडळींनी सातारा जिल्ह्यातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे नेतृत्व केले. दुष्काळात खेड्यात जाऊन धान्य वितरण असो की, एमआयडीसीमधील कामगारांचा संघर्ष असो. सर नक्की धडक मारत असे. जागतिक कामगार दिनाच्या मोर्चाचे आयोजन म्हणजे अगदी त्यांच्या घरचे कार्य असायचे. त्यांना मोलाची साथ देणारे कॉ. अंजलीताई यांनी काही दिवसांपूर्वी अखेरची बचतही पक्षाला देणगी म्हणून दिली आहे. कॉ. सिताराम येचूरी यांच्या हस्ते महाबळेश्‍वरकर दांपत्याचा सातारकरांनी सत्कार केला होता.

COMMENTS