मुंबई प्रतिनिधी - मराठा समाजाचा प्रदीर्घ काळ चाललेला आरक्षणाचा लढा अखेर संपला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मर
मुंबई प्रतिनिधी – मराठा समाजाचा प्रदीर्घ काळ चाललेला आरक्षणाचा लढा अखेर संपला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तसा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या विजयानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनाकडे सर्वांचेलक्ष लागले होते. आपली एकजुट आपण कायम ठेवली. अतिशय संयम आणि शिस्तीने आंदोलन पुर्ण केलं. कुठेही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपले सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. मी दिलेला शब्द पाळला. शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, आम्ही दिलेला शब्द पाळतो,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS