Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ. संभाजी चौक ते आझाद चौक रस्त्याचे अपुरे काम पूर्ण करा

अन्यथा आंदोलन करू; राष्ट्रवादी (श. प.) चा इशाराईश्‍वरपूर / प्रतिनिधी : उरुण-ईश्‍वरपूर शहरातील गांधी चौकातून एसटी स्टॅण्डकडे जाणार्‍या मुख्य रस्

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र सरकारवर मोठे आव्हान
उचलली जीभ, लावली टाळ्याला!

अन्यथा आंदोलन करू; राष्ट्रवादी (श. प.) चा इशारा
ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : उरुण-ईश्‍वरपूर शहरातील गांधी चौकातून एसटी स्टॅण्डकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील छत्रपती संभाजी चौक ते आझाद चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम अपुरे असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. हे छत्रपती संभाजी चौक ते आझाद चौकापर्यंतच्या रस्त्याचे अपुरे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा उरुण-ईश्‍वरपूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. उरुण-ईश्‍वरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना युवकांचे शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष अभिजित कुर्लेकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र ते अपूर्ण अस्वस्थेत आहे. हा शहरातील मुख्य रस्ता असल्याने शहरातील व विविध कामासाठी बाहेरून शहरात येणार्‍या नागरिकांना याचा त्रास होत आहे. तसेच या परिसरात रहाणारे जैन समाजाचे भाविक सकाळी देव पूजेला घरातून अणवानी जातात आणि येतात. त्यांनाही याचा मोठा त्रास होत आहे. तरी तातडीने हे काम पूर्ण करून घ्यावे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनात दिला आहे.
याप्रसंगी युवक राष्ट्रवादीचे अथिक मणेर, अक्षय यमगर, अक्षय जाधव, हेमकिरण पाटील, अजय खवळे, रोहित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

COMMENTS