Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'हे दुकानात मिळणार नाही..' हे वाक्य त्यांना महागा

स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’
टायगर-क्रिती सेननच्या ‘गणपत’ मध्ये अमिताभ बच्चनची दमदार एन्ट्री.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल.

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘हे दुकानात मिळणार नाही..’ हे वाक्य त्यांना महागात पडलं आहे. खोटी माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिग बींच्या एका वाक्यामुळे ऑफलाईन दुकानदार नाराज झाले आहेत. एका जाहिरातीमुळे अमिताभ बच्चन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बिग बी हे फ्लिपकार्टचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत. आता फ्लिपकार्टची ‘द बिग बिलियन डेज’ ही ऑफर सुरू होणार आहे. बिग बी यांनी या ऑफरसंबंधित एक जाहिरात केली असून या जाहिरातामुळेच त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फ्लिपकार्टची ‘बिग बिलियन’ऑफर लवकरच सुरू होणार आहे. या ऑफरची माहितीदेणारी एक जाहिरात बिग बी यांनी केली होती. यातील मोबाईल कंपनीच्या जाहीरातीमुळे ते चर्चेत आले आहेत. या जाहीरातीत ते म्हणाले की,”या वस्तू तुम्हाला ऑफलाईन दुकांनामध्ये मिळणार नाहीत”. त्यांच्या या एका वाक्यामुळे ऑफलाईन दुकानदार नाराज झाले असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिग बी यांनी खोटी माहिती दिली असून ग्राहकांमध्ये भ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

COMMENTS