Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणबीर कपूर आणि विकी कौशल मध्ये स्पर्धा

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सॅम बहादुर' या चित्रपटाचं पोस्टर काल अभिनेत्यानं शेअर केलं आहे. त

New mumbai : महानगरपालिकेचा मनमानी कारभार… नेरूळ झोपडपट्टीवर चालवला बुलडोझर…. | LokNews24
पाटण तालुक्यातील शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी; पाटण येथील बैठकीत निर्णय
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचं पोस्टर काल अभिनेत्यानं शेअर केलं आहे. त्यानं यावेळी खुलासा केला की उद्या टिझर प्रदर्शित होणार त्या प्रतिक्षेत असताना आता आनंदाची बातमी म्हणजे चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विकी हा फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅम मानेकशॉ यांनी 1971 मध्ये भारत-पाक युद्धात भारतीय सेनेला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. विकी कौशलच्या लूकनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. खरंतर जेव्हा पासून विकीचा या चित्रपटातील फस्ट लूक समोर आला होता तेव्हा पासून प्रेक्षक याची उत्सुकता ही खूप प्रचंड वाढली होती. विकीच्या चाहत्यांना त्याला भारताच्या सगळ्यात लोकप्रिय आणि लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सॅम माणेकशॉच्या पत्नी सिल्लू यांची भूमिका अभिनेत्री सान्या मल्होत्रा साकारताना दिसणार आहे. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या भूमिकेत फातिमा सना शेख आणि जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या भूमिकेत नीरज काबी आहे.

या टीझर विषयी बोलायचे झाले तर हा 1.25 मिनिटांचा आहे. या टीझरच्या सुरुवातीला विकी कौशलचा दमदार लूक पाहायला मिळतो.त्यानंतर विकी बोलतो की एका सैनिकासाठी त्याच्या जीवा पेक्षा जास्त महत्त्वाची असते त्याची वर्दी आणि त्याच्या वर्दीसाठी सैनिक जीवही देऊ शकतो. त्यानंतर युद्धाचे काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. त्यासोबत दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतील असे डायलॉग्स देखील ऐकायला मिळत आहेत. तर त्याची पत्नी म्हणजेच सान्या मल्होत्रा त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. एक लष्कर प्रमुख कशा प्रकारे त्याच्या सैनिकांचा सगळ्या गोष्टीसाठी पाठिंबा देतो आणि देशाचे रक्षण करतो हे पाहून अनेक लोक भावूक झाले आहेत.

COMMENTS