करंजीतील नुकसानग्रस्तांचा आत्मदहनाचा इशारा पाथर्डी : तालुक्यातील करंजी येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा नुकसानग्रस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे. गेल्या वर्षी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यात करंजी गावाला सर्वाधिक फटका बसला. शासनाकडून पंचनामे करून तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, चार ते पाच महिने उलटूनही अद्याप बाधित कुटुंबांना कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. करंजी येथील सुभाष अकोलकर, मिर्झा मणियार, बाबासाहेब गाडेकर, राजेंद्र पारे, अश्विन साखरे, बाळासाहेब साखरे, भाऊसाहेब मोरे, बाळासाहेब पावसे, बाबासाहेब खोसे, रमेश शिंदे, शिवाजी पारे, शफिक शेख, कैलास थोरात, बाळासाहेब दानवे आदी नुकसानग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. गावातील उत्तरेश्वर मंदिराजवळील पुलाला अतिवृष्टीत मोठे भगदाड पडले असून अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. मंदिराच्या विरुद्ध बाजूला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तसेच घोरदरा पाझर तलावाच्या सांडव्याची दिशा बदलण्याची मागणीही दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापुरामुळे अनेक बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तो तातडीने काढण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
करंजीतील नुकसानग्रस्तांचा आत्मदहनाचा इशारा
पाथर्डी : तालुक्यातील करंजी येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा नुकसानग्रस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या वर्षी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यात करंजी गावाला सर्वाधिक फटका बसला. शासनाकडून पंचनामे करून तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, चार ते पाच महिने उलटूनही अद्याप बाधित कुटुंबांना कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
करंजी येथील सुभाष अकोलकर, मिर्झा मणियार, बाबासाहेब गाडेकर, राजेंद्र पारे, अश्विन साखरे, बाळासाहेब साखरे, भाऊसाहेब मोरे, बाळासाहेब पावसे, बाबासाहेब खोसे, रमेश शिंदे, शिवाजी पारे, शफिक शेख, कैलास थोरात, बाळासाहेब दानवे आदी नुकसानग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. गावातील उत्तरेश्वर मंदिराजवळील पुलाला अतिवृष्टीत मोठे भगदाड पडले असून अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. मंदिराच्या विरुद्ध बाजूला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तसेच घोरदरा पाझर तलावाच्या सांडव्याची दिशा बदलण्याची मागणीही दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महापुरामुळे अनेक बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तो तातडीने काढण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

COMMENTS