बीड प्रतिनिधी - सद्यस्थितीला जिल्हाभरातील सोयाबीनसह इतर प्रमुख पिकांचे, गोगलगायी तसेच इतर प्रकारच्या किडींनी प्रचंड नुकसान केले आहे. अगोदरच पावस

बीड प्रतिनिधी – सद्यस्थितीला जिल्हाभरातील सोयाबीनसह इतर प्रमुख पिकांचे, गोगलगायी तसेच इतर प्रकारच्या किडींनी प्रचंड नुकसान केले आहे. अगोदरच पावसामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच गोगलगायी पिकांचे रोपटे नष्ट करत आहेत. शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे पीकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात ऐन पेरणीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाला. अगोदरच पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांची दुरावस्था झाली असताना आता शंखी गोगलगायी तसेच इतर प्रकारच्या किडींनी, सोयाबीनसह इतर प्रमुख पिकांची उगवलेली रोपटे नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. शेतकर्यांपुढे आता गोगलगायींचा प्रादुर्भावाचे नियंत्रण व दुबार पेरणीचे संकट उभे राहीले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
COMMENTS