Homeताज्या बातम्यादेश

समान नागरी कायदा आणण्यासाठी कटिबद्ध

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही

नवी दिल्ली प्रतिनिधी - जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आणि राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर मोदी सरकार लवकरच समान नागरी कायदा लागू क

गोर्टा स्मारक निजामाच्या राजवटीतून केलेल्या मुक्ततेंचे प्रतीक
पाकव्याप्त काश्मीरसाठी 24 जागा राखीव
पंतप्रधान मोदींसह शहांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आणि राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर मोदी सरकार लवकरच समान नागरी कायदा लागू करण्याच्या विचारात असून, तसे संकेतच खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. मोदी सरकारने पुन्हा एकदा आपला मोर्चा समान नागरी कायद्याकडे वळवला असून, समान नागरी कायदा आणण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दिली आहे. सन 2024 पर्यंत राज्यांनी हा कायदा करावा अन्यथा आम्हीच कायदा करु, असंही शहा यांनी म्हटले आहे. माध्यमांच्या शिखर परिषेदत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
या कार्यक्रमात त्यांनी समान नागरी कायद्यासह जम्मू आणि काश्मीर तसेच गुजरात निवडणुकांवरही भाष्य केले आहे. शहा म्हणाले, समान नागरी कायदा हे भाजपचे वचन आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा हा कायदा लागू करण्यात यावा असे संविधान सभेने देखील म्हटले आहे. याबाबत संविधान सभेने राज्य विधिमंडख आणि संसदेला तशा सूचना केल्या आहेत. तसेच धर्माच्या आधारावर कायदे बनवू नये असेही म्हटले आहे. असे असतानाही भाजप व्यतिरिक्त दुसरा एकही पक्ष समान नागरी कायद्याला पाठिंबा देत नाही किंवा त्यावर बोलतही नाही. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. या राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायद्यासाठी पॅनलची स्थापना केली आहे. हे पॅनल कायद्यासंदर्भात सरकारला सल्ला देणार आहे. जशा शिफारसी येतील त्याप्रमाणे आमची सरकारे यावर काम करणार आहेत. मी याची खात्री देतो की समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही शहा यावेळी म्हणाले.

COMMENTS