Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिक सिलिंडर 48 रुपयांनी महागला

मुंबई : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या धक्क्यांनी झाली आहे. मंगळवारी व्यावसायिक सिलिंडर तब्बल 48 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे राजधानीत व्य

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल
मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू ; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश | DAINIK LOKMNTHAN
Gas Cylinder Crossed Rs 1,900 And Prices Increased For The Third  Consecutive Month - Gondwana University

मुंबई : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या धक्क्यांनी झाली आहे. मंगळवारी व्यावसायिक सिलिंडर तब्बल 48 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे राजधानीत व्यावसायिक सिलिंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पीपीएफ आणि सुकन्या खात्याशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. पॅन कार्ड बनवण्यासंबंधीचे नियमही बदलण्यात आले आहेत.
ऑगस्ट महिन्यापासून सलग ऑक्टोबरपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ही वाढ झाली आहे. तर 14 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठलाही बदल झाला नाही. सणासुदीत गॅस सिलेंडरचा भाव वधारल्याने त्यांना झटका बसला आहे. दिल्ली ते चेन्नई आणि मुंबई ते कोलकत्ता अशी वाढ झाली आहे. 19 किलोच्या गॅस सिलेंडरची नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. राजधानी दिल्लीसह इतर महागनगरातील किंमतीत वाढ झाली आहे. सणासुदीत आता हॉटेलिंग आणि दिवाळीचा फराळ महागणार आहे. बाहेरून फराळ खरेदी करणार्‍या ग्राहकांना त्याचा फटका बसेल. सर्वच किंमती वधारलेल्या असताना गॅस दरवाढीमुळे फराळ महाग मिळेल. मुंबईत 19 किलोचा गॅसची किंमत सप्टेंबर महिन्यात 1605 रुपयांनी वाढवून 1644 रुपयांवर पोहचली. त्यात आता पु्न्हा एकदा वाढ झाली. आता देशाच्या आर्थिक राजधानीत आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये आहे.

COMMENTS