Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याचे काम वाखाणण्याजोगे – अजमेरा

पुणे/प्रतिनिधी : जिल्ह्याने सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे असून महाविद्यालयात राबविण्यात आलेली मतदार नोंदणी मोहीम ही देशपा

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या | LOK News 24
अंकुश आणि अबोली यांच्यात पुन्हा एकदा घेतलाय लग्न करण्याचा निर्णय.
चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)

पुणे/प्रतिनिधी : जिल्ह्याने सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे असून महाविद्यालयात राबविण्यात आलेली मतदार नोंदणी मोहीम ही देशपातळीवर मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे स्वीप संचालक संतोष अजमेरा यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अजय पवार, केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निलेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी उपस्थित होते.
अजमेरा म्हणाले, जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरणाचे कामही चांगल्याप्रकारे झाले आहे. प्रत्येक मतदान केंद्र क्षेत्रात मतदार मार्गदर्शिका वितरित करावी. छायाचित्र मतदार ओळखपत्र नसले तरी इतर 12 पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येते याबाबत त्यांना माहिती द्यावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती द्यावी. विशिष्ट भागात मतदान कमी होण्याची कारणे लक्षात घेऊन त्यास अनुसरून जनजागृती संदेश देण्यात यावे. उद्योग संघटनांच्या मदतीने कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. कमी मतदान असलेल्या भागात मतदारांना मतदान करण्यासाठी पत्राद्वारे आवाहन करण्यात यावे. विविध माध्यमातून चांगले उपक्रम राबविल्याने जिल्ह्यात दिव्यांग मतदारांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याने मतदार नोंदणी आणि मतदार यादी शुद्धीकरणासाठी राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यस्तरावर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले, दोन्ही मतदारसंघात कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या मतदान केंद्र परिसरात मतदार जागृतीवर भर देण्यात येत आहे. मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजनबद्ध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. 

COMMENTS