मुंबई प्रतिनिधी - आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी भारती सिंह नेहमीच चर्चेत असते. आता मात्र मनोरंजनामुळे नाही तर दवाखाण्यात पो

मुंबई प्रतिनिधी – आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी भारती सिंह नेहमीच चर्चेत असते. आता मात्र मनोरंजनामुळे नाही तर दवाखाण्यात पोहचल्यामुळे भारती चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, बेडवरुन पडून भारतीला कंबरेमध्ये दुखणे सुरु झाले, त्यासाठी ती दवाखाण्यात पोहचली आहे. ती बेडवरुन कशी पडली याबद्दल तिनेच खुलासा केला आहे. भारती सिंहने व्हिडिओ शेअर करत याबद्दल तिने सविस्तर माहीती दिली आहे. ती म्हणते- माझ्या डोक्याचे मसाज करणे चालू होते, अचानक मी मागे सरकले आणि बेडवरुन खाली पडले. पडल्यानंतर पहिल्यांदा मला आणि मसाजवालीला हसू आवरले नाही. मात्र नंतर कंबरेमध्ये वेदना सुरु झाल्या त्या इतक्या तीव्र होत्या की मला दवाखाण्यात जावे लागले, असे म्हणत भारतीने आपबीती सांगितली आहे. भारती सिंह ही भारतीय टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. टीव्हीशिवाय भारती आपल्या ब्लॉग्जच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिच्या पडण्यामुळे भारतीचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.
COMMENTS