Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवार यांनी घेतली कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक

5 सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याची केली मागणी

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, या आवर्तनात नियोजनाचा अभाव समोर आल्यान

आ. रोहित पवारांच्या माध्यमातून उद्या विकासकामांचे भूमिपूजन
आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण
खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, या आवर्तनात नियोजनाचा अभाव समोर आल्याने आ. रोहित पवार यांनी अधिकारी व शेतकर्‍यांची बैठक घेतली. कर्जत तालुक्यातील करमनवाडी, येसवडी, काळेवाडी, करपडीसह पाच-सहा गावे पाण्यापासून वंचित राहण्याची तसेच थेरवडी, दुरगाव, चिलवडी व कोपर्डी येथील तलावही रिकामेच राहण्याची भीती असल्याने आ. पवार यांनी शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन बैठक घेतली.
सध्या कुकडीचे सुरू असलेले आवर्तन हे 30 ऑगस्ट रोजी बंद करण्यात येणार आहे. परंतु असे झाले तर तलावही रिकामेच राहतील आणि अनेक गाव पाण्यापासून वंचित राहतील. ही गोष्ट लक्षात घेऊन आ. पवार यांनी अधिकार्‍यांना बरोबर घेऊन शेतकर्‍यांसह बैठक घेतली. 30 तारखेऐवजी 5 सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. सरकार बदलल्यानंतर झालेल्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना त्याची अडचण होत आहे. शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये, असे आ. रोहित पवार यांनी अधिकार्‍यांना बजावून सांगितले. त्यावर अधिकार्‍यांनीही सर्व भागाला पाणी मिळेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचा शब्द दिला. सध्याच्या सत्तेत असलेल्या सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे मतदारसंघातील अनेक गावे व येथील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणे ही अतिशय गंभीर बाब आहे. पूर्वी मविआ सरकार असताना पावसाचे अतिरिक्त पाणी आपण लोकांना एक अधिकचे आवर्तन देऊन मोफत दिले होते. आणि आता यंदा लोकांना असे वाटत होते की, हे देखील आवर्तन मोफत आहे. परंतु हे मोफत आवर्तन नसून शेतकर्‍यांना यासाठी सरकारकडे पट्टी भरावी लागणार आहे. यावेळी बैठकीत कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने शेतकर्‍यांच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही, असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS