Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जयंत पाटील यांच्याकडे राज्याला नवी दिशा देण्याची क्षमता : राज्य प्रवक्ता नितेश कराळे

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याच

संगमनेर शहरात त्या ठिकाणी दुषित जलशुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
म्हसवडमधील अतिक्रमन विरोधी कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरु
15 दिवसांत कारखाना सुरु करा : मदन भोसले यांचे नूतन संचालकांना आवाहन

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची, राज्याला नवी दिशा देण्याची क्षमता आहे. ते राज्याच्या सर्वोच्च पदी बसू शकतात. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ता नितेश कराळे यांनी रेठरेहरणाक्ष येथील जाहीर सभेत बोलताना केले.
राज्य सरकारने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महिला, शेतकरी, युवक आदी सर्व घटकांसाठी ज्या योजना जाहीर केल्या, त्या सगळ्या फसव्या आहेत. ही गद्दारी, भ्रष्टाचारी, जातीयवादी शक्तींच्या विरोधातील लढाई आहे. राज्याचा स्वाभिमान मातीत घालणार्‍यांना, मातीत गाडा, असे आवाहनही त्यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, सरपंच शुभांगी बिरमुळे, उपसरपंच अभिजित मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कराळे म्हणाले, भाजपा भ्रष्टाचारी पार्टी झाला आहे. भ्रष्ट नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये साफ करून पक्षात घेत आहेत. मालवणचा छत्रपतींचा पुतळा पडला. कारण यांनी त्यातही पैसे खाल्ले आणि निकृष्ट काम केले. हा केवळ पुतळा पडला नाही, तर त्यांनी आपला स्वाभिमान मातीमोल केला आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालास चांगला दर देण्याचे जाणीवपूर्वक टाळत आहेत. राज्यात 3-3 मामा असताना राज्यातील लाडके भाचे बेरोगजार आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात पळवीत आहे. हे का विरोध करत नाहीत? राज्यात महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. आमच्या महिलांवर अन्याय-अत्याचार वाढले आहेत. मोदी-शहांनी अनेक संस्था, उद्योग मोडीत काढले आहेत. त्यांनी आपल्या राज्यावर वक्र दृष्टी आहे, सावध रहा. मी गेल्या 8 दिवसापासून पवारसाहेबांच्या बरोबर राज्यात फिरत आहे. हा 84 वर्षाचा योध्दा सर्वसामान्य माणसांचे सरकार आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत आहे. संपूर्ण राज्यातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यात निश्‍चितपणे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
बी. जी. पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीवर आपला प्रपंच चांगला चालला आहे. आपली पोरं-बाळं शिकली आहेत. हा सहकार मोडण्याचा सत्ताधार्‍यांचा डाव आहे. ते साखर कारखान्यावरून अप प्रचार करत आहेत. जातीयवादी आणि गद्दारांचा राज्याला मोठा धोका आहे. आपण क्रांतिकारकांचे वारसदार आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीस मतदान करून हा धोका परतवून लावूया.

COMMENTS