Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची भावनिक साद

रत्नागिरी प्रतिनिधी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिलं आहे. भास्कर जाधव यांनी एकनाथ शि

मध्यरात्री जाधव यांच्या घरावर दगडफेक
ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव
भुंकणारा कुत्रा चावत नसतो;शिवसेनेवर रामदास कदमांची जहरी टीका

रत्नागिरी प्रतिनिधी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिलं आहे. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंची बाजू लावून धरली होती. विधानसभेत भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांना अंगावर घेताना दिसून येत होतं. भास्कर जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतेपदावर संधी देण्यात आली होती. मात्र, भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहून तुमच्याशी बोलायचं असल्याचं म्हटलं आहे. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, या सर्वांमध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काय होता, असं म्हणत भास्कर जाधव यांनी रविवारी समर्थकांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला १९८५ पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच २००७ पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात.

COMMENTS