Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ’बकरी ईदच्या’ शुभेच्छा

कोपरगाव : कोपरगाव शहरात मुस्लीम बांधवांनी ‘बकरी ईद’ सण मोठ्या उत्साहात साजरा केला असून आ. आशुतोष काळे यांनी देखील मुस्लीम बांधवांच्या आनंदात सहभा

सात नंबर पाणी मागणी अर्जासाठी मुदतवाढ द्या
आ. आशुतोष काळेंकडून कोल्हे गटाला पुन्हा धक्का
सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीत दाखल करावे

कोपरगाव : कोपरगाव शहरात मुस्लीम बांधवांनी ‘बकरी ईद’ सण मोठ्या उत्साहात साजरा केला असून आ. आशुतोष काळे यांनी देखील मुस्लीम बांधवांच्या आनंदात सहभागी होवून सर्व मुस्लीम बांधवांना ‘बकरी ईद’ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
            मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश असून त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणून ‘बकरी ईद’ सणाकडे पाहिले जाते.कोपरगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लीम बांधवाना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांनीही एकमेकांना आलिंगन देवून बकरी ईदच्या एकेमकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS