राहाता प्रतिनिधी ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची विटंबना केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दा
राहाता प्रतिनिधी ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची विटंबना केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, मनुस्मृति या ग्रंथातील श्लोकाचा राज्य शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यास विरोध असल्या बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राहाता पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. राहाता पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दि. 28 मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथांचे दहन केले. त्या दरम्यान त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर फाडले. यामुळे राज्यातील तसेच देशभरातील आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा च्या वतीने राहाता तालुका यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांचे हे कृत्य अत्यंत बेजबाबदारपणाचे असून त्यांच्यावर ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. तसेच मनुस्मृती या ग्रंथातील श्लोकाचा महाराष्ट्र राज्यातील शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असून याचा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राहाता तालुका यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विटंबना केल्या प्रकरणी आ जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ ट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा. व मनुस्मृती ग्रंथातील श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नये तसे झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राहाता तालुका यांच्याकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रदीप बनसोडे युवा जिल्हाध्यक्ष, धनंजय निकाळे राहाता ता. अध्यक्ष, राजेंद्र पाळंदे राहाता शहराध्यक्ष, गणेश निकाळे, भिमराज निकाळे, रमेश कसबे, दिलीप निकाळे, माऊली निकाळे, सुनील लोखंडे, कैलास गायकवाड, किशोर दंडवते, अमोल भोसले, प्रशांत कोळगे, बाबासाहेब खरात, प्रतीक खंडिझोड, साहिल खंडीझोड, आकाश बनसोडे, राहुल पाळंदे, दीपक गायकवाड, शकील शेख, गणेश साळवे, दर्शन कोळगे, गणेश बनसोडे आधी जणांच्या या निवेदनावर स्वाक्षर्या आसून अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS