Homeताज्या बातम्याक्रीडा

डब्ल्यूटीसी स्पर्धेत रंग भरायला सुरुवात 

क्रिकेटच्या भरगच्च कार्यक्रमात कधी वनडेचा विश्वचषक तर कधी टि२० चा विश्वचषक खेळला जातो आणि त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. मात्र ते सुख व

18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात
भारताच्या अडचणी वाढल्या ; ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त
पाक चाहत्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून रोखले

क्रिकेटच्या भरगच्च कार्यक्रमात कधी वनडेचा विश्वचषक तर कधी टि२० चा विश्वचषक खेळला जातो आणि त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. मात्र ते सुख वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप अर्थात डब्ल्यूटीसी स्पर्धेला मिळत नाही. वनडे व टि२० हे सफेद चेंडूवर खेळले जाणारे क्रिकेट कसोटी क्रिकेटच्या तुलनेत झटपट निकाल देणारे व प्रेक्षक, संयोजक, खेळाडू व त्या प्रारूपाशी समरस असणाऱ्या सर्वांनाच सोयीस्कर वाटते. कसोटी क्रिकेटचा विचार केला पाच दिवस चालणारे क्रिकेट हे पूर्वी काहीसे रटाळ व निरस वाटायचे पाच – पाच दिवस खेळ होऊनही सामन्याचा निर्णय लागत नसे. इतके दिवस कामधंदे बुडवून प्रेक्षकांनाही कसोटी सामने बघणे कोणत्याही दृष्टीने परवडणारे नव्हते. म्हणून आयसीसीने पारंपारीक व अस्सल क्रिकेट असलेले कसोटी सामने जगविण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या. कसोटी क्रिकेटच्या नियमांत बदल केले. कसोटी क्रिकेटचे खरेखुरे चाहते पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटकडे वळण्यासाठी प्रेक्षकांना व रसिकांना सोयीस्कार जावे म्हणून डे -नाईट क्रिकेटची संकल्पनाही अमंलात आणली. तसेच वनडे व 

टि २० तील आक्रमकता कसोटीतही आली तसेच इंग्लंडचा बॅजबॉल फॉर्मूला यशस्वी ठरत आहे. शिवाय

 याला जोड म्हणा की नवा उपाय आयसीसी मानांकनात अव्वल आठ संघात कसोटी सामन्यांचा विश्वविजेता ठरविण्याची नवी योजनाही सुरू केली. त्यामुळे कसोटी क्रिकेटला नवसंजिवनी मिळाली व प्रेक्षकवर्गही जागृत होऊन कसोटी क्रिकेटचा आस्वाद घेऊ लागला आहे.

                क्रिकेटच्या वनडे, टि२० व कसोटी या तिनही प्रारूपांकडे नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की, टि२० क्रिकेट हे केवळ धसमुसळे क्रिकेट आहे. यात तंत्रा पेक्षा ताकदीचा खेळ आहे. ज्या दिवशी ज्याची लॉटरी लागेल तो विजेता ठरेल. बारकाईने विचार केला तर या प्रारूपात कौशल्य व तंत्र यांना फारसा थारा नाहीच. मात्र कसोटी क्रिकेट नावाप्रमाणेच असून यामध्ये तंत्र, मंत्र, कौशल्य, संयम, संतुलन, तंदुरूस्ती या बाबींचा पूर्ण कस लागतो. त्यामुळे हा खेळ सामन्याचे पाचही दिवस मनोरंजक ठरतो व जो या पूर्ण पाच दिवसात स्वतःवर पूर्ण नियत्रंण ठेवेल तोच बाजी मारून जातो. वनडे क्रिकेट या दोन्ही प्रकारांचं मिश्रण आहे. त्यामुळे त्याचा प्रेक्षकवर्गही वेगळा व मोठा आहे.

             कसोटी क्रिकेटची विश्व अजिंक्यपद स्पर्धा (डब्ल्यूटीसी) सध्या आपले तिसरे संस्करण खेळत आहे. यापूर्वी सन २०१९-२१ व सन २०२१ ते २०२३ या कालखंडात दोन स्पर्धा झाल्या त्यामध्ये अनुक्रमे न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया विजेते ठरले. तर दोन्ही वेळा टिम इंडियाने अंतिम फेरी गाठली खरी परंतु विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. आता सन २०२३-२५ या तिसऱ्या चरणातील स्पर्धा रंग धरू लागली आहे.

              भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया,  न्युझिलंड, वेस्ट इंडिज यांनी आपले अभियान सुरू केले असून दक्षिण आफ्रिका बॉक्सिंग डे टेस्टच्या माध्यमातून भारताविरूध्द खेळून आपल्या अभियानाचा श्रीगणेशा करणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांवर नजर टाकली तर पाकिस्तानने दोन सामन्यात दोन विजय मिळवून १०० टक्के गुण वसुल केले. तर दुसऱ्या स्थानावरील भारताने दोन पैकी एक विजय व एक अनिर्णितसह ६६.६७ गुण जमा केले आहेत. बांगलादेश व न्युझिलंडने प्रत्येकी दोन सामने खेळून एक विजय व एक पराभव चाखल्याने प्रत्येकी ५० टक्के गुणांसह अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान प्राप्त केले आहे. पाचव्या स्थानी विराजमान असलेल्या ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यात प्रत्येकी दोन जय व दोन पराजय तसेच एक सामना अनिर्णित अशी कामगिरी करुन तीस टक्के गुण कमावले आहेत. सहाव्या स्थानी वेस्ट इंडिज असून त्यांची दोन सामन्यात एक पराभव व एक ड्रॉ सह १६.६७ टक्के विजयाची सरासरी आहे. इंग्लंड सातव्या स्थानावर असून सहा सामन्यात प्रत्येकी दोन विजय, पराजय, अनिर्णितसह केवळ १५ टक्के गुणांची सरासरी त्यांच्या खात्यावर जमा आहेत. श्रीलंकेने दोन सामने खेळले व ते दोन्ही गमावल्याने त्यांना अजून आपले गुणांचे खाते उघडायचे असून ते आठव्या स्थानी आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला  आपले अभियान सुरू करायचे आहे. 

               सध्या टिम इंडिया तीनही प्रारूपातील क्रिकेट मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तेथे दोन कसोटी सामने खेळणार आहेत. भारताने द. आफ्रिकेत आतापर्यंत मालिका विजय मिळविल नाही. या वेळेस टिम इंडिया कशी कामगिरी करतो यावरच मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. भारताचा संघ कागदोपत्री मजबूत असला तरी कोणत्याही यजमानांना त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविणे बोलतो इतके सोपे नाही. परंतु या लढती उत्कंठावर्धक नक्कीच होतील. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया उणे दहा व इंग्लंड उणे एकोणा वीस पेनल्टी गुण मिळवून अडचणीत आहेत.

                पाकिस्तान देखील सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून मागील पस्तीस वर्षात भारत सोडून जगातला कुठलाही संघ ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत हरवू शकला नाही. भारताने मागील दोनही मालिकांमध्ये कांगारूंना त्यांच्याच कळपात घुसून चिरडले आहे. तर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात मालिका विजयांचे सोडाच पण सन १९९५ पासून तेथे एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आता तर नवा कर्णधार, कमजोर फलंदाजी, अननुभवी गोलंदाज व ढिसाळ क्षेत्ररक्षक आणि अति विद्वान प्रशिक्षक व त्यांचा सहाय्यक चमू यांच्या भरवशावर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरविणे सोडाच एखादा सामना वाचविणेही पाकिस्तानच्या आवाक्यातले दिसत नाही. त्यामुळे या मालिकेनंतर पाकिस्तान पुन्हा  गुणतालिकेत अव्वलस्थानी दिसणार नाही ही काळी दगडावरची रेष आहे.

COMMENTS