Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयीन विद्यार्थिनीमध्ये बॉयफ्रेंड वरून तुफान राडा

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे एखाद्या गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ एका झटक्यात व्हायरल होतात. आतापर्यंत

पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी
दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी ‘महाशरद’ उपक्रम
सत्ता नसतानाही माजी आ.प्रदीप नाईक जाणून घेत आहेत जनतेच्या समस्या

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे एखाद्या गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ एका झटक्यात व्हायरल होतात. आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही तरुण आणि तरुणी, महिला आणि पुरुष यांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर शाळकरी मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या शाळकरी मुली शाळा सुटल्यानंतर भररस्त्यात एकमेकींना मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. या मुलींनी एकमेकींचे केस ओढत लाथा-बुक्यांनी मारहाण केली आहे. बॉयफ्रेंडवरुन या तीन मुलींमध्ये ही हाणामारी झाली असल्याचे कारण समोर आले आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स पोट धरुन हसत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारच्या बाजूला काही विद्यार्थिनी उभ्या आहेत. यामधील एका विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीच्या केसाची वेणी पकडलेली दिसत आहे. सुरुवातीला या तिघी एकमेकींना काही तरी विचारताना दिसत आहे. त्यानंतर जे काही सुरु होते ते तर पाहण्यासारखेच आहे.या तिन्ही विद्यार्थिनी एकमेकींना मारहाण करु लागतात. केस ओढून लाथा-बुक्याने त्या एकमेकिंना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या विद्यार्थिनींची भांडण पाहून आसपास उभे राहिलेले सर्व विद्यार्थी त्यांना हसताना दिसत आहेत. त्यानंतर दोन पुरुषांनी मध्ये घुसून या विद्यार्थिनींची भांडणं सोडवली. हे व्यक्ती भांडण सोडवत असताना सुद्धा त्या एकमेकींना मारहाण करतच असल्याचे दिसत आहे.

COMMENTS