सांगली : जतमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघढकीस आली. या खून प्रकरणी एका संशयित तरुणाला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात

सांगली : जतमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघढकीस आली. या खून प्रकरणी एका संशयित तरुणाला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जतमधील आर.आर. महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्गात शिक्षण घेणारी अक्षता कोरे हिचा खून झाला आहे. सकाळी ती कॉलेजसाठी घराबाहेर पडली होती. नेहमीच्यावेळी ती घरी न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला. दरम्यान राजवाड्याच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी तरुणीचा मृतदेह पडल्याचे समजले. पाहणी केली असता बेपत्ता अक्षताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
COMMENTS