पाथर्डी : पाथर्डी व शेवगाव शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दोन्हीही शहर
पाथर्डी : पाथर्डी व शेवगाव शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दोन्हीही शहरातील प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
राजळे म्हणाल्या की, पाथर्डी शहरातील रामगीरबाबा टेकडी, मेहरटेकडी, इंदिरानगर तर शेवगाव शहरातील रामनगर, शामनगर, इंदिरानगर, वाल्मीकनगर, वडारवस्ती, बजरंगनगर शासकीय जागेवरील घरांसाठी पट्टे वाटप करणे, पाथर्डी तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन हस्तांतरीत करणे, पाथर्डी नगरपालिकेच्या अग्नीशमन केंद्रास जागा मिळणे, शेवगाव पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहतीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची जागा मिळावी या विषयावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, प्रशासकीय अधिकारी डॉ.उद्धव नाईक, अकाश दहाडदे, योगेश खैरे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, मुख्याधिकारी संतोष लांडगे व विजया घाडगे, भुमि अभिलेखचे उपाधिक्षक निखील मोरे, नगरसेविका डॉ.शारदा गर्जे, मनिषा उदमले, नगरसेवक, डॉ. जगदीश मुने, प्रतिक नांगरे, शेवगाव पालिकेचे नगरसेवक नितीन दहिवाळकर, सागर फडके, कमलेश गांधी, विनायक मोहिते, डॉ. निरज लांडे, कैलास तिजोरे, खंडू बुलबुले, राहुल वरे, बापुराव धनवडे, राहुल सावंत, राहुल मालुसरे, अभिनव अंधारे, भुषण देशमुख, किरण पवार, अनिल वडागळे, सचिन अदमाने, अजय भारस्कर हे उपस्थित होते.
या बैठकीत आशिया यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व्हे व मोजणी करून सर्वांना घरे या योजने अंतर्गत पट्टे वाटपाचे नियोजन करावे, पाथर्डी शहरातील अतिक्रमणधारकांचे सात बारा वर नाव लावण्यासाठी सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सादर करावा, पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्नीशमन केंद्रासाठी शासकीय जागा आठ दिवसात हस्तांतरीत करण्यात येईल, पाथर्डी तालुका क्रीडा संकुलाची जागा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करावी, पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, शेवगाव पोलिस ठाणे व कर्मचारी वसाहतीसाठी जागा मोजणी करून तातडीने प्रस्ताव सादर करावा, दातीरवाडी येथे सेवाभवन बांधण्यासाठी गायरान जागा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. तसेच शेवगाव शहरातील जागांचे सर्व्हे करून समितीने निर्णय घ्यावेत. आवश्यक त्या बाबीसाठी कॅम्प लावण्याच्या सूचना या वेळी आशिया यांनी दिल्याचे राजळे म्हणाल्या.

COMMENTS