इस्लामपूर : प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करावे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, तानाजी साठे, प्रभाक
इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रूपयाचे अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर धरणे, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदनाद्वारे दिला. या निवेदनात म्हटले आहे की, प्रामाणिक शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रूपयाचे अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना तात्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. सन 2017 ते 2020 तीन वर्षीत नियमित कर्ज भरलेल्या शेतकर्यांना 50 हजार रूपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान तात्काळ जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे थकीत व नियमित शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची अमंलबजावणी तातडीने सुरू होती.
सांगली जिल्ह्यातील नियमित पीककर्ज भरण्याची सांगली जिल्ह्यातील चार हजार लाभार्थी शेतकरी असुन शेतकर्यांना 60% लाभ मिळाला आहे. 40% अजुनही विंचीत आहेत. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील लाभार्थी शेतकर्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. अजुनही जिल्ह्यातील 18 कोटी रूपये अनुदान प्रतिक्षेत लाभार्थी शेतकरी वंचित आहेत. ती प्रोत्साहन अनुदान रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी. अन्यथा इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात इशारा देण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, प्रवासी वाहतूक संघटनेचे तानाजी साठे, प्रवक्ते अॅड. एस. यु. संदे, अनंत शेटे, प्रभाकर पाटील, अशोक बल्लाळ, प्रकाश माळी, भैरवनाथ कदम, प्रकाश देसाई, काशीनाथ निंबाळकर, रमेश पाटील, शहाजी पाटील, रविकिरण माने, सचिन पाटील यांचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS