Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे  तत्काळ अनुदान जमा करा-राजेंद्र आमटे

शिवसंग्रामचे तहसीलदार यांना निवेदन

बीड प्रतिनिधी - मागील वर्षीच्या अतीवृष्टी मधून वगळण्यात आलेल्या शेतकर्‍यांना सतत च्या पावसाचे तुटपुंजे अनुदान आले तहसील कार्यालय अनुदान जमा असूनह

प्रदूषणाची वाढती पातळी
विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार | LOKNews24
मनपा थकबाकीचा आकडा सहाशे कोटींवर 

बीड प्रतिनिधी – मागील वर्षीच्या अतीवृष्टी मधून वगळण्यात आलेल्या शेतकर्‍यांना सतत च्या पावसाचे तुटपुंजे अनुदान आले तहसील कार्यालय अनुदान जमा असूनही शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्यात वेळ का लागत आहे.? शेतकर्‍यांचे सतत पावसाचे नुकसान भरपाई अनुदान जमा का केले जात नाही? तत्काळ शेतकर्‍याच्या खात्यावर नुकसान भरपाई अनुदान रक्कम जमा करण्यात यावी या मागणीसाठी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने अनिल घुमरे, प्रा सुभाष जाधव सर यांच्या मार्गर्शनाखाली काल  तहसीलदार जीवने साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात तत्काळ शेतकर्‍याच्या खात्यावर नुकसान भरपाई अनुदान जमा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली अन्यथा शिवसंग्राम शेतकर्‍यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष  राजेंद्र आमटे यानी दिला या प्रसंगी  बीड पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,प्रा. जाधव सर, शिवसंग्राम ज्येष्ठ नेते गोपनाथ घुमरे, युवा नेते मुकुंदजी गोरे, शिवसंग्राम शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, खाजा भाई पठाण, रवी घुमरे, वसंत सपकाळ, वाणी निर्मळवाडी आदीच्या उपस्थीती होती.

COMMENTS