Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 1 नोव्हेंबरनंतरच थंडीची लाट

मुंबई : राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा म्हणावा तसा तडाखा दिसून येत नाही. वातावरणात कधी ओलाव तर कधी गरमीचे वातावरण दिसून येत आहे. सध्या ऑक्टोबर हिटमु

लाच प्रकरणातील पोलिसाला अखेर पोलिसांनी पकडले
धम्म गौतमाचा
दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक | LOKNews24

मुंबई : राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा म्हणावा तसा तडाखा दिसून येत नाही. वातावरणात कधी ओलाव तर कधी गरमीचे वातावरण दिसून येत आहे. सध्या ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील जनतेचे चांगलेच हाल होत आहे. तर दुसरीकडे राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. त्यामुळे थंडीचे दिवस कधीपासून सुरू होईल याची प्रतीक्षा शेतकर्‍यांसह सर्वच वर्गांना दिसून येत आहे. मात्र 1 नोव्हेंबरनंतरच थंडीची लाट राज्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
थंडी तब्बेतीसाठी जशी पोषक असते, तशीच पिकांसाठी देखील चांगली असते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार आहे. म्हणजेच दिवाळीपासून राज्यात थंडी सुरू होणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस देखील विश्रांती घेणार आहे. ऑक्टोबर अखेरला मान्सूनची सांगता होणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या भागात थंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात 4 दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. 4 दिवसांत दक्षिण नगर , पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या 18 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.

COMMENTS