Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदाच्या नावाची उद्या घोषणा ; भाजपचे सीतारामन, रुपाणी पक्षाचे निरीक्षक

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून तब्बल 9 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, राज्यात सरकार स्थापन होवू शकलेले नाही. मात्र महायु

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान
Jr. NTR च्या फॅन्सचा धिंगाणा, थिएटरला लागली आग
जामखेडमध्ये एसटीचा भोंगळ कारभार

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून तब्बल 9 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, राज्यात सरकार स्थापन होवू शकलेले नाही. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या चर्चा अंतिम ठप्प्यात आल्या असल्या तरी, एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदावर आडून असल्याचे दिसून आले आहे. मात्र भाजपने तिसर्‍यांदा आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख बदलण्याची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता ही बुधवारी 4 डिसेंबरला होणार असून, या बैठकीतच मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोघांच्या उपस्थितीतच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आझाद मैदानावर पोहोचून शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व देवेंद्र फडणवीस सोमवारी दुसर्‍यांदा दिल्ली दौर्‍यावर जाणार आहेत. ते संभाव्य मंत्र्यांची यादी व त्यांच्या रिपोर्ट कार्डसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे, फडणवीस आणि पवार हे तिघेही दिल्लीला गेले होते.

मुख्यमंत्री मीच व्हावे अशी जनतेची इच्छा : एकनाथ शिंदे
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आपणच मुख्यमंत्रीपदी हवे असल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यांनीदिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ’मी सर्वसामान्यांसाठी काम करतो. मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मीच व्हावे अशी जनतेची इच्छा आहे.’ एकनाथ शिंदे यांनी आजच्या आपल्या सर्वच बैठका रद्द केल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

COMMENTS