मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथून अधिवे

मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे गेले. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच आपल्या ताफ्यातील रुग्णावाहिका आणि आपला अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल या महिलेने त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीचा स्वभाव पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता आला.
COMMENTS