Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले; उध्दव ठाकरे यांचा आरोप

मुंबई / प्रतिनिधी : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला. राज्यात नियोज

उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
आमचे वैचारिक व्यासपीठ एकच – उद्धव ठाकरे

मुंबई / प्रतिनिधी : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला. राज्यात नियोजन शून्य विकासकामे सुरू आहेत. हे असंवैधानिक मुख्यमंत्री कृत्रिम पाऊस पाडणार होते. पण ते देखील त्यांना करता आले नाही. मुंबईत प्रदूषण वाढत आहेत, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

उध्दव ठाकरे म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले. आधीच केंद्राच्या नाकर्ते धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला होता. आता कांदा गेला. मी मुख्यमंत्री होतो त्यामुळे मला काही गोष्टी माहित आहेत. सर्व माहिती जाग्यावर मिळते. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री स्वत:चे घर सोडून इतरांची घरे धुंडाळतात. आता देखील ते राज्यात नसून तेलंगणात गेले आहेत. ते तेलंगणात कुठल्या भाषेत बोलणार? सुरत, गुवाहाटी, गोवा हा चोरटेपणाचा प्रवास ते सांगणार आहेत का? स्वत:चे घर न सांभाळता दुसर्‍याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. राज्य वार्‍यावर आहे. एक फुल दोन हाफ, दोन हाफ कुठे आहेत याची तर काहीच कल्पना नाही, अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली.

काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळाने काय केले?. पिक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही, असे आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते. मात्र, ते दिवाळीत काही दिसले नाहीत. त्यांनी कुठे फटाके फोडले त्यांना माहिती, असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला. इतर राज्यात निवडणुका असताना भाजपवाले रेवडी उडवतात. महाराष्ट्राने काय पाप केले. पंतप्रधान क्रिकेटच्या फायनला जातात पण मणिपूरला जात नाहीत. आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना सगळ्यांना दमदाटी करायला वेळ आहे. इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे. मात्र, राज्यातील शेतकर्‍यांच्या पाठीवर हात फिरवण्याला त्यांना वेळ नाही.

COMMENTS