Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनमंत्री मुनगंटीवार यांना क्लीन चीट

33 कोटी वृक्ष लागवड प्रकरण

नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्य

महिलेवर अत्याचार.. माजी पोलिस निरीक्षकांच्या मुसक्या आवळल्या l पहा LokNews24
राजकीय पक्षांचे अमाप पीक ?
बिहारसाठी बजेटमध्ये 26 हजार कोटींची तरतूद

नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले आहे. परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आले होता. महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवालात सांगण्यात आले आहे. सोबतच राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला असल्याचे समोर आले आहे. राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची  महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. कालांतराने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केला होता.  परिणामी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा विधानसभेत केली होती. या समितीने केलेया सखोल चौकशी अंती सादर केलेल्या अहवालात कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले आहे. परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली असून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोडून काढण्यात आले आहे.  

COMMENTS