Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार राहुल कुल यांना भ्रष्टाचारप्रकरणी ’क्लीन चीट’

मुंबई/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून १ हजार १०० बेडचे कोव्हिड सेंटर | आपलं नगर | LokNews24
मोफत वधू-वर ग्रुपची आज खरी गरज ः मीनाताई जगताप

मुंबई/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र राहुल कुल यांना राज्य सरकारने दिली क्लीन चीट दिली आहे. जिल्हा पुणे तालुका दौंडा येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत सरकारने ही क्लीन चीट दिली आहे.
साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही, असे सांगण्यात आले आहे. 2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाहीये, मात्र 2021-22 लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तराता म्हटलं आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्‍नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तर, इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकार्‍यांची नेमणूक केली असून अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्‍वासन दिले आहे.

COMMENTS