मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तर

मुंबई : बारावीची परीक्षा होवून अनेक दिवसांचा कालावधी उलटला असून, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रगतीपथावर असतांनाच एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. यावेळी घराला लागलेल्या आगीत या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून, या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा हा यक्षप्रश्न बोर्डासमोर उभा ठाकला आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, हा प्रकार मुंबईतील विरारमध्ये घडला आहे. विरारमध्ये 12 वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत आहे. असे पेपर घरी आणता येतात का ?, ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजीपणा आहे, पेपर जाळले की जळाले याचा बोलींज पोलिस तपास करत आहेत.
COMMENTS