Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालना-यवतमाळमध्ये फुटला दहावीचा पेपर ! ; कॉपीमुक्त अभियानाला हरताळ

जालना/यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कॉपीमुक्

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार
देशाचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे ते संपवू शकणार नाही-प्रणिती शिंदे 
SSC Paper Leaked In Yavatmal & Jalna : राज्यात दोन ठिकाणी दहावीचा पेपर  फुटला! उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून वापट; बोर्ड काय म्हणाले?

जालना/यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कॉपीमुक्त जिल्ह्याचा संकल्प केला होता, मात्र दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी मराठी भाषेचा पेपर लीक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी जालना आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात पेपर फुटला आहे.
यवतमाळच्या महागावमध्ये आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीचा मराठी पेपर फुटला आहे. हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजीही बघायला मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणी आता चौकशी सुरु केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. यासंदर्भात बोर्डाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आलेले नाही. दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून राज्यभरात सुरूवात झाली आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉफी मुक्त अभियानाचा फज्जा उडला. एकीकडे प्रशासनाच्या वतीने कॉफी मुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे पहिल्याच मराठीचा पेपर जालना जिल्ह्यामध्ये लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर केवळ वीस रुपयात परीक्षा केंद्र बाहेर पेपरची कॉपी मिळत होती, असा देखील आरोप केला जात आहे. त्यामुळे आता या संदर्भात शिक्षण विभाग काय निर्णय घेतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या तळणी गावात कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडल्याचे पाहायला मिळाले. येथील परीक्षा केंद्रावर कॉफी पुरवण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. याचे काही व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. मात्र परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या गैरप्रकार काडे शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. 17 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8,64,920 मुले आणि 7,47,471 मुली आहेत. 19 तृतीयपंथी आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 2 हजार 165 विद्यार्थी संख्या वाढली आहे. एकूण 23492 शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून 5130 केंद्रांवर परीक्षा होत आहे. 1 लाख 80 हजार मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे,

पेपर फुटला नाही, दगडफेक झाली : जिल्हाधिकार्‍यांचा दावा
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पण जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसून, केवळ दगडफेकीची घटना घडल्याचा दावा केला आहे. स्थानिक झेरॉक्स सेंटर चालकांनी परीक्षेत न आलेल्या प्रश्‍नांची झेरॉक्स काढून विकली. मराठीची प्रश्‍नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS