Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा-ओबीसी आरक्षणावरून खडाजंगी  

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

मुंबई ः राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न ज्वलंत बनला असून, सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडतांना दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्य

इस्लामपूरात 19 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा : विजयबापू पाटील
डॉ. विशाल गुंजाळ यांची गव्हरनिंग कॉन्सलिंग पदी नियुक्ति
जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर २०२४ ला भाजपचा पराभव होईल – अमोल मातेले 

मुंबई ः राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न ज्वलंत बनला असून, सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडतांना दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्यामुळे सत्ताधारी आमदार बुधवारी सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षांनी कुणाच्या आदेशावरून या बैठकीला दांडी मारली? असा कळीचा प्रश्‍न सत्ताधार्‍यांनी या प्रकरणी उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर आमदार नीतेश राणे, आशिष शेलार, सुरेश कुटे, अमित साटम यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कुणाच्या सांगण्यावरून ’बहिष्कार’ टाकल्याचा सवाल उपस्थित केला. यावेळी महायुतीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीनवेळा सभागृह तहकूब करण्याची वेळ आली. भाजपचे आमदार अमित साटम यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विरोधी पक्षाचे नेते आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होत आहे. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे. यांना ना ओबीसींची पडली, ना यांना मराठ्यांची पडली. विरोधकांनी इथे जाहीर करावे की, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही?, असा सवाल साटम यांनी केला. नीतेश राणे म्हणाले की, विरोधी पक्षातील नेते वाद निर्माण करत आहे. मविआच्या नेत्यांनी मराठा समाजाला कसे आरक्षण मिळावे हे जाहीर केले पाहिजे. समाजाच्या तरुणाचे भविष्य आंधारात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राणेंनी विरोधकांवर केला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी देखील सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. सत्ताधार्‍यांच्या आरोपानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार तीन वेळेस उत्तर देण्यास उभे राहिले, मात्र सत्ताधार्‍यांकडून घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

महायुतीकडून आरक्षणाचे राजकारण ः दानवे – मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसून, सत्ताधारी पक्षाचे लोक आरक्षणाबाबत वेगळी भूमिका घेत आहे. तीन पक्षाच्या 3 नेत्यांची तोंड वेगवेगळीकडे आहेत. सर्वपक्षीयच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारणाचा प्रकार सरकारला राजकारण करायचे आहे. सरकार काय निर्णय घेते ते त्यांनी स्पष्ट करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

सत्ता सोडा, आम्ही आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू ः वडेट्टीवार – राज्य सरकारकडे पाशवी बहुमत असल्यामुळे त्यांनी विनाकारण विरोधकांवर खापर फोडू नये, शिंदे, फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी, अन्यथा त्यांनी सत्ता सोडावी आम्ही आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू असे प्रतिआव्हानच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिले. ते माध्यमांसोबत बोलत होते. सरकारने  दोन्ही समाजाला न्याय दिला पाहिजे, परंतु सरकारला त्यात काहीच करायचे नाही, हे लोक दोन्ही समाजाच्या भावनांशी खेळ मांडत आहेत, सरकारच्या हाताला काय लकवा मारला काय?, तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, बाजूला व्हा, विषय कसा सोडवायचा ते आम्ही ठरवू, विनाकारण आमच्यावर दोष देऊ नका, अशी संतप्त प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.

COMMENTS