Homeताज्या बातम्यादेश

कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्ल्लीत गेल्या काही दिवसांपासून भारताचे कुस्तीवीर आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याव

लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
नीरज चोप्राची वर्ल्ड चॅम्पियन शिपच्या फायनलमध्ये धडक
सुवर्णपदकाविनाच संपली भारताची मोहीम

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्ल्लीत गेल्या काही दिवसांपासून भारताचे कुस्तीवीर आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीवर आंदोलन करत असून त्यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान जंतर मंतरवर हे आंदोलन सुरु असताना बुधवारी दिल्ली पोलीस आणि आंदोलक कुस्तीवर आमने-सामने आले होते. दरम्यान, यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी कुस्तीवीर विनेश फोगाटला अश्रू अनावर झाले. आपल्यासह आंदोलन करणाऱ्या काही सदस्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे. “या परिसरात पाणी भरलं आहे. झोपण्यासाठी जागा नसल्याने आम्ही खाटा घेऊन इथे आलो आहोत. आम्ही जेव्हा खाटा घेऊन येत होतो तेव्हा धर्मेंद्र या पोलीस कर्मचाऱ्याने आम्हाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती,” असं विनेश फोगाट व्हिडीओत सांगताना ऐकू येत आहे. दिल्लीत कुस्तीवीरांचं आंदोलन सुरु असून यावेळी पोलीस आणि त्यांच्यात राडा झाला. पोलिसांनी आमच्यावर हल्ला करत अत्याचार केला असा कुस्तीवारांचा आरोप आहे. या राड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत काही आंदोलन पोलीस कर्मचाऱ्यांनी दारुच्या नशेत दोन कुस्तीवीरांवर हल्ला केल्याचा आरोप करत असल्याचं ऐकू येत आहे.

COMMENTS