नवीमुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील सेक्टर 16 येथील भर रस्त्यात एका 19 वर्षीय मुलावर सहा जणांनी जीवघेणा हल्ला केला असून, यात

नवीमुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील सेक्टर 16 येथील भर रस्त्यात एका 19 वर्षीय मुलावर सहा जणांनी जीवघेणा हल्ला केला असून, यात त्याच्या मानेवर कोयत्याने वार झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. यात सहा जणांविरोधात 307 आणि अन्य कलामांखाली गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे फिर्यादी जखमी गटाकडून टी शर्ट ची छपाई केली जाते. या टी शर्ट वर आरोपी असलेला सुनील किंद्रे याच्या नावाची छपाई केली जाते. मात्र यावर्षी तसे न केल्याने सुनील किंद्रे आणि इतर पाच साथीदारांनी फिर्यादी याला विचारणा केली आणि रागात येत आरोपीने फिर्यादी आणि त्याचा मित्र यांच्यावर कोयत्याने वार केले आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केवळ टी शर्ट वर नाव न टाकल्याने जीवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस अधिक माहिती आणि तपास करत आहेत. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
COMMENTS