पुणे प्रतिनिधी - पुण्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सिंहगड(Sinhagad) रस्त्यावरील किरकटवाडी(Kirkatwadi) येथील दोन इमारतींतील रहिवाश
पुणे प्रतिनिधी – पुण्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सिंहगड(Sinhagad) रस्त्यावरील किरकटवाडी(Kirkatwadi) येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी फ्रीस्टाइल हाणामारी झाली. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समोर येत आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हाणामारीत महिलाही जखमी झाल्या आहेत. दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात(Haveli police station) परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

COMMENTS