नांदेड : नांदेड शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस ग

नांदेड : नांदेड शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक शाखेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, केवळ नऊ दिवसांच्या कालावधीत वाहतुकीचे नियम मोडणार्या तब्बल 1 हजार 919 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 21 लाख 12 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी 2 लाख 54 हजार 350 रुपयांची प्रत्यक्ष वसुली करण्यात आली आहे. उर्वरित 1 हजार 641 वाहनधारकांवर 18 लाख 57 हजार 750 रुपयांचा दंड प्रलंबित आहे. नांदेड उत्तर शहर वाहतुकीची जबाबदारी यापूर्वी पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे यांच्याकडे होती. मात्र ते सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने त्यांनी उर्वरित सेवाकाळासाठी रजा घेतली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्याकडे सोपविली आहे. नियुक्तीनंतर नागरगोजे यांनी पहिल्याच दिवसापासून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून मोहीम सुरू केली आहे. कठोर कारवाईमुळे वाहतूक नियमांचे पालन वाढण्याची अपेक्षा नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शहर वाहतूक शाखा व वजीराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील महत्त्वाच्या चौकांवर तपासणी मोहीम राबवली. रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कला मंदिर परिसर, वर्कशॉप चौक, राज कॉर्नर आणि छत्रपती चौक या ठिकाणी वाहनांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान खालील प्रकारच्या नियमभंगांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले- परवाना नसताना वाहन चालविणे ,ट्रिपल सीट वाहन चालविणे,अवैध प्रवासी वाहतूक,वाहनांची कागदपत्रे नसणे,नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारी अनधिकृत फळगाडे व हातगाडे याशिवाय अनेक ऑटोचालक गणवेश न घालता प्रवासी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना गणवेश परिधान करण्याबाबत तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारीवरही लगाम घालण्यात यश सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांची कारकीर्द यापूर्वीही उल्लेखनीय राहिली आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात कार्यरत असताना त्यांनी रस्ता सुरक्षा पथकाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण कारवाया केल्या. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत 50 पेक्षा जास्त खंजीर आणि तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच दरोडे, जबरी चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यातही पथकाला यश मिळाले. याशिवाय रस्त्यावर मद्यपान करणार्या 1 हजारांहून अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कठोर कारवाईमुळे शहरातील अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी आणि शरीराविरुद्धचे गुन्हे कमी झाल्याचे दिसून आले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी नागरगोजे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले होते. त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवूनच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी शहर वाहतूक शाखेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे. वाहतुकीच्या शिस्तीसाठी पुढील उपाययोजना नागरगोजे यांनी स्पष्ट केले की, आगामी काळात शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाहनांची फिटनेस, परमिट, इन्शुरन्स आणि पीयूसी तपासणी नियमितपणे केली जाईल. तसेच खालील बाबींवरही विशेष कारवाई होणार आहे- गणवेश न घालणारे ऑटोचालक रस्त्यावर नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणारे चालक रस्त्यातच ऑटो उभे करून प्रवासी भरणारे चालक दुकानांचे साहित्य रस्त्यावर ठेवणारे दुकानदार रस्त्यांवर अनधिकृत फळगाडे व हातगाडे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे विक्रेते सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करणार्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सहकार्य करणे अत्यावश्यक शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हे केवळ पोलीस प्रशासनाचे काम नसून त्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे, वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवणे तसेच रस्त्यावर अतिक्रमण टाळणे ही जबाबदारी नागरिकांनीही पार पाडली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिक, दुकानदार आणि वाहनधारक यांनी नियमांचे पालन केल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर प्रश्नचिन्ह दरम्यान, शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागही चर्चेत आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र प्रत्यक्षात फिल्डवरील काही अधिकार्यांनी अतिक्रमणधारकांची डायरी तयार करून त्यांच्यावर कारवाई टाळल्याची चर्चा सुरू आहे. या डायर्यांमध्ये रस्त्यांवरील किरकोळ व्यापारी, फळविक्रेते आणि हातगाडी चालक यांची नावे असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी फिल्डवरील कामांसाठी थेट शिफारशी आणल्या जात असल्याचेही चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर लक्ष देऊन अशा डायर्यांना आळा घालणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील वाहतूक सुधारण्याची अपेक्षा सध्या शहर वाहतूक शाखेने सुरू केलेल्या कठोर मोहिमेमुळे वाहनधारकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर पोलीस प्रशासन, महापालिका आणि नागरिक यांच्यात समन्वय साधला गेला, तर नांदेड शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही धडक कारवाई आगामी काळातही सुरू राहणार असल्याने, शहरातील विस्कळीत वाहतुकीला निश्चितच शिस्त लागेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

COMMENTS