Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक

इस्लामपूर : पोर्टेबल हेल्थ युनिटची पाहणी करताना पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, डॉ. नरसिंह देशमुख, सतीश महाडिक व सुजीत थोरात. इस्लामपूर / प्रत

चांदोली धरणातून 7680 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग: वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा
भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

इस्लामपूर / प्रतिनिधी : अमेरिकन इंडिया फाऊंडेशन व मास्टर कार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला 100 मॉड्युलर बेड दिलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे मागील कोरोना काळात बेड मिळत नसल्याने किती लोकांना आपला जीव गमवावा लागला ते आपण पाहिल आहे. त्यामुळे जी सुविधा या लोकांनी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा नागरिकांनाही व्यवस्थित वापर करावा, असे आवाहन वाळवा पंचायत समिती गटनेते राहुल महाडिक यांनी केले.
वाळवा पंचायत समिती गटनेते राहुल महाडिक यांनी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील पोर्टेबल हेल्थ युनिटला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
महाडीक म्हणाले, महाराष्ट्र शासनाने जी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचेही आभार मानावे लागतील कारण ह्या गोष्टीचा दूरगामी उपयोग होणार आहेत.
यावेळी वैद्यकीय अधिकारी नरसिंह देशमुख यांनी सर्व प्रोजेक्टची, ऑक्सिजन क्षमता, लसीकरण या व विविध विषयांवर माहिती दिली. इस्लामपूरचे माजी नगरसेवक सतिश महाडिक, महाडिक युवाशक्त अध्यक्ष सुजित थोरात, डॉ. राणोजी शिंदे, समीर मुलाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS