Homeताज्या बातम्यादेश

गुजरातचे नागरिक सुजाण आणि विवेकी : पंतप्रधान मोदी

विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला होणार जाहीर

अहमदाबाद वृत्तसंस्था :- गुजरातचे नागरिक सुजाण आणि विवेकी आहेत. ते सर्व काही ऐकतात परंतु नेहमी सत्याचे समर्थन करतात असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रध

देशात भ्रष्टाचार आणि जातीयवादाला थारा नाही
भारत सेमीकंडक्टरमध्ये जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदींचा विश्‍वास
जनतेचा सरकारवरील विश्‍वास उडाला

अहमदाबाद वृत्तसंस्था :- गुजरातचे नागरिक सुजाण आणि विवेकी आहेत. ते सर्व काही ऐकतात परंतु नेहमी सत्याचे समर्थन करतात असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यासाठी अहमदाबाद येथे मतदान केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी लोकशाहीच्या या निवडणूक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील जनतेने लोकशाहीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. मला देशातील जनतेचे आभार मानायचे आहेत. निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमती विधानसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. यापूर्वी निशान पब्लिक स्कूल, राणीप येथे जाताना लोकांचे अभिवादन स्वीकारले. मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीटरद्वारे म्हणाले की, अहमदाबादमध्ये माझे मतदान केले. मतदान करणार्‍या सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले.


दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, गुजरात आणि विधानसभा निवडणुकांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, याचा निकाल गुरुवारी 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालामध्ये कोणता चमत्कार होतो की, भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येतो, याचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे.

पंतप्रधानांनी बजावला मतदानाचा हक्क – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि अंतिम भागासाठी मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमती विधानसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. यापूर्वी निशान पब्लिक स्कूल, राणीप येथे जाताना लोकांचे अभिवादन स्वीकारले. विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 2.51 कोटी मतदार 93 जागांसाठी 833 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यात अहमदाबाद, वडोदरा आणि गांधीनगरसह 14 जिल्ह्यांमध्ये 93 मतदारसंघ आहेत.182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

COMMENTS