Homeताज्या बातम्यादेश

सिटी बँक, अ‍ॅक्सिसमध्ये विलीन

नवी दिल्ली : सिटी बँकेचा ग्राहक व्यवसाय बुधवारपासून पूर्णपणे अ‍ॅक्सिस बँकेच्या नियंत्रणाखाली आली आहे. सिटी बँकेचा ग्राहक व्यवसाय अ‍ॅक्सिसने पूर्ण

अदानी प्रकरणात लपवण्यासारखे काहीही नाही
समृध्दीवरची गावे समृद्ध होवोत ! 
सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी जनजागृती आवश्यक ः अ‍ॅड. शिंदे

नवी दिल्ली : सिटी बँकेचा ग्राहक व्यवसाय बुधवारपासून पूर्णपणे अ‍ॅक्सिस बँकेच्या नियंत्रणाखाली आली आहे. सिटी बँकेचा ग्राहक व्यवसाय अ‍ॅक्सिसने पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ही अधिग्रहण प्रक्रिया सुरू होती. सिटी बँकेच्या विलिनीकरणाचा थेट परिणाम भारतातील सिटी बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे. क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, किरकोळ बँकिंग आणि विमा वितरणासह अनेक व्यवसाय सिटी बँकेच्या ग्राहक व्यवसायाचा भाग आहेत. सिटी ग्रुपने आपला जागतिक व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 2021 मध्ये याची घोषणा केली होती.
या अंतर्गत 13 देशांमधील रिटेल बँकिंग ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताचाही समावेश आहे. अ‍ॅक्सिस आणि सिटी बँक यांच्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये करार झाला होता. अ‍ॅक्सिस बँकेने गेल्या वर्षी सांगितले की, त्यांनी सिटी बँकेचा भारतातील ग्राहक व्यवसाय 12 हजार 325 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यासाठी करार केला आहे. सिटी बँकेच्या ग्राहक व्यवसायात कर्ज, क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन आणि रिटेल बँकिंग ऑपरेशन्स समाविष्ट आहेत. बँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये श्रीमंत ग्राहकांचा समावेश आहे. बँकेला अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये अ‍ॅक्सिस बँकेला यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) मंजुरी मिळाली होती.

COMMENTS