Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरी गेलेले साहित्य सिडको ग्रामीण पोलिसांनी सन्मानपूर्वक केले परत

नांदेड प्रतिनिधी - सिडको ग्रामीण पोलिसांनी चोरीस गेलेले साहित्य जप्त करून ज्यांची आहे त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. विविध गुन्हयातील पोल

मारुती महाराज कारखान्याने दिला 2555 रुपये भाव
समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके

नांदेड प्रतिनिधी – सिडको ग्रामीण पोलिसांनी चोरीस गेलेले साहित्य जप्त करून ज्यांची आहे त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. विविध गुन्हयातील पोलीसांनी आरोपीतांकडून  गेला माल नगदी 50, हजार रुपये पैकी पुर्ण 50,000/- रु रक्कम हस्तगत करून तक्रारदार यांना सन्मानपुर्वक केले परत केले.
दि .13 मार्च 23 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे फिर्यादी नामे अशोक कोडींबा इंगोले वय 55 वर्षे, व्यवसाय शेती रा. लाठखुर्द ता. कंधार जि. नांदेड यांनी तक्रार दिली की, ते सिडको येथे अवधुत पवार यांचे मुलीचे लग्नास जाण्यासाठी वासवी क्लब मंगल कार्यालय लातुर फाटा येथे रोडवर 11:26 वाजण्याचे सुमारास थाबले असता त्यांचेजवळ एक अँटो आला त्यामध्ये तीन अनोळखी व्यक्ती बसलेले होते. त्यानी अवधुत पवार यांचे मुलीचे लग्न कुठे आहे म्हणुन तक्रारदार यांना विचारणा केली असता त्यांनी समोरील वासवी मंगल कार्यालयात लग्न आहे असे सांगीतले. त्यांनी तक्रारदार यांना आपण सर्व मंगल कार्यालयात लग्नाला जावु असे म्हणुन तक्रारदार यांना अ‍ॅटो मध्ये बसविले व लग्नात भेट वस्तु सिडको येथुन घेवुन येऊत म्हणुन ढवळे कॉर्नर मार्गे सिडको येथे घेऊन गेले. त्यानंतर आम्हाला काम आहे म्हणुन सदर अ‍ॅटोचालकांना तक्रारदार यांना संभाजी चौकात उतरविले व निघुन गेले सदर बाबत त्यांची शंका आल्याने तक्रारदार यांनी त्यांचे वॉचपॉकेटाकडे पाहीले असता त्यांचा खीसा फाटला होता. सदर अँटोंतील लोकांनी त्यांचे खिशातील 50,000/- रुपये घेवून निघून गेलेबाबत कळाल्याने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दिलेल्या तक्रारीवरुन  कलम 379,34 भा.दं.वि. प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करुन सपोउपनि शिंदे यांचेकडे तपास कामी देण्यात आला. सदर गुन्हयांत  पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब,  अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार साहेब,  उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, उपविभाग इतवारा श्री. डॉ. सिध्देश्वर भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक  अशोक घोरबांड साहेब यांनी तपास अधिकारी सह. पोलीस निरीक्षक शेषेराव शिंदे यांना योग्य मार्गदर्शन करून पो.स्टे. चे गुन्हे शोध पथकाचे सहाय्याने रेकॉर्डवरील आरोपी चेक करुन तसेच स्थानिक स्त्रोताचे सहाय्याने सदर गुन्हयांतील आरोपी नामे 01) सय्यद बशीर सय्यद महेबुब वय 43 वर्षे, रा. ताज नगर नांदेड ता. जि. नांदेड 02) मंगेश नारायण सोनकांबळे वय 31 वर्षे, रा. आंबेडकर नगर, नांदेड ता.जि. नांदेड, 03) आकाश विश्वास कुंटे, वय 30 वर्षे, रा. सकोजी नगर, नांदेड ता. जि. नांदेड,04) रवि श्याम सुंदर भोकरे, वय 32 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी कौठा, नांदेड ता. जि. नांदेड यांना अटक करुन त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झाल्याने सदर आरोपीतांकडून गुन्हयांतील गेला माल नगदी 50,000/- रुपये जप्त करुन आज रोजी फिर्यादी यांना डॉ. सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी  उपविभाग इतवारा, नांदेड यांचे हस्ते 50, हजार रुपये सन्मानपुर्वक परत केले आहेत. पोलीस उपविभाग इतवारा श्री. डॉ. सिध्देश्वर भोरे  यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, अशोक घोरबांड, तपास अधिकारी शेषेराव शिंदे, व डी. बी. पथकाचे  बिचेवार,  वाकडे, मलदोड, जाधव, क-हाळे, स्वामी, पवार, बेल्लुरोड यांचे विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS