बायोडिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

बायोडिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये गाजत असलेल्या बायोडिझेल प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी तसेच पे

वेस शाळेच्या चिमुकल्यांनी जागविला देशभक्तीचा जागर
देवळाली प्रवरात तलवारी फिरवत तरूणांची दहशत
महंत स्वामी अरुणाथगिरी महाराज यांच्या हस्ते राष्ट्रीय श्रीराम संघाचा शुभारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये गाजत असलेल्या बायोडिझेल प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी तसेच पेट्रोलियम कायदा 1934 प्रमाणे सर्व दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिव राष्ट्रसेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयास दिले असून, या निवेदनाची दखल न घेतल्यास शिवराष्ट्र सेनेच्यावतीने येत्या सात दिवसांमध्ये उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बायोडिझेल प्रकरणातील सर्व आरोपींनी सरकारच्या महसुलाची फसवणूक करून शासनाला कोट्यवधीचा गंडा घातला आहे. पोलीस प्रशासनाचे कुठलेही या आरोपींना भय राहिलेले नाही, राजरोसपणे नगर शहरातील बायपास महामार्गावर अनधिकृतपणे शेड उभारून बायोडिझेल विक्री करत होते. बायोडिझेल विक्री करून त्यांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे तसेच नगर शहरासह जिल्ह्यामध्ये या बायोडिझेल विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. या सर्व आरोपींना राजकीय आश्रय आहे.त्यामुळे फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

COMMENTS