पेन ड्राईव्ह बॉम्बप्रकरणाचा तपास सीआयडीकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेन ड्राईव्ह बॉम्बप्रकरणाचा तपास सीआयडीकडे

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई/प्रतिनिधी ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हचा बॉम्ब टाकून सत्ताधार्‍यांची झोप उडवली होती. त्याचे पडसाद सोमवारी वि

मुसळधार पावसाने काठी शाळेची संरक्षण भिंत जमीनदोस्त
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
शिवभोजन चालकांची दादागिरी; टार्गेट पूर्ण करण्यासाठी रस्त्याहून जाणार्‍यांना दमदाटी !


मुंबई/प्रतिनिधी ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हचा बॉम्ब टाकून सत्ताधार्‍यांची झोप उडवली होती. त्याचे पडसाद सोमवारी विधीमंडळात उमटले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. यासंदर्भात बोलतांना वळसे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आपण करणार आहोत. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास सीआयडीकडे सोपवण्यात येत आहे. त्यातून वस्तुस्थिती बाहेर येईल अशी मला अपेक्षा आहे, अशी मला आशा आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करत पोलीस खात्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना फडणवीस यांनी सभागृहाचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना पेन ड्राईव्ह सुपूर्द केला. माजी मुख्यमंत्र्यांनी दावा केला की पेन ड्राईव्हमध्ये 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, ज्यामध्ये पोलीस आणि महाविकास आघाडीचे सदस्य भाजपाच्या नेत्यांना अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात कट रचत होते. भ्रष्टाचारांना संरक्षण दिल्यामुळे कोट्यवधी लोकांचा उडालेला विश्‍वास, गुडांकडून मिळालेल्या धमक्या, एसटी आणि आरक्षणा याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडला गेला. या प्रस्तावाचा विषय खूप मोठा आहे. परंतु दुर्देवाने चर्चेत भाग घेताना राज्याच्या समस्यांना हात घालून मला काही मार्गदर्शन मिळेल असं वाटलं होतं. पण विरोधी पक्षनेत्यांनी अधिकाधिक वेळ दोन प्रकरणांसाठी खर्च केला. तुमच्याच प्रश्‍नावर उत्तर दिलं. कायदे सुव्यवस्थेची आकडेवारी नाही दिली तर मीही तसंच उत्तर दिलं असं होईल, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

राजकीय खटले घेणार मागे
राजकीय आंदोलनातील खटले मागे घेणार असल्याचे सुतोवाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केले. राजकीय आंदोलनातील 188 चे सर्व खटले पाठिमागे घेण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे. प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून, जिल्हाधिकार्‍याच्या कार्यक्षेत्रात असेल तर जिल्हाधिकार्‍यांकडून आल्यावर केसेस मागे घेणार, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पोलिस दलात होणार 7231 पदांची भरती
पोलीस दलात आणखी 7231 पदांची भरती करण्यात येईल. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. या भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेऊ. त्यानंतर पुढील दोन वर्षातील भरती करायची त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे नेऊ. त्याला मंजुरी दिली तर आणखी पोलीस भरती होईल, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पोलीस दलात भरती होऊ इच्छिणार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS