Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चितळसर पोलिसांची कारवाई, घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक 

ठाणे प्रतिनिधी - चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मवीरनगर, तुळशीधाम ठाणे येथील राहत्या घराला लॉक लावून फिर्यादी गुपमा अनुप पांडे यांच्या बंद

शेजारच्याने गळफास घेतल्याचे पाहून चिमुकल्याने ही घेतला गळफास I LOKNews24
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हलगी मोर्चा
पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार

ठाणे प्रतिनिधी – चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मवीरनगर, तुळशीधाम ठाणे येथील राहत्या घराला लॉक लावून फिर्यादी गुपमा अनुप पांडे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा कापून 2 लाख 52 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीनी दिवसाढवळया गजबजलेल्या वस्तीत आरोपींनी धाडसी घरफोडी करून ते मुद्देमालासह परागंदा झालेले होते. सदरची घरफोडी पोलिसांनी गंभीरतेने घेतली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व त्यावरून आरोपी निष्पन्न केले. फुटेजमध्ये दिसत असलेले आरोपी हे सराईत घरफोडी चोरी करणारे अट्टल व खुनशी वृत्तीचे आरोपी असल्याबाबत माहीती पोलिसांना मिळाली. सीसीटीव्हीतील एक आरोपी अब्दुल जमीर पठाण वय ४१ वर्षे रा. चंद्रभागा बिल्डींग नं. ८ रुम नं.५ लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द, मुंबई-४७ हा गायत्री हॉटेल, शिवाजीनगर, मानखुर्द परिसरात येणार असल्याची पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने सापा रुतून तीन जणांना अटक केली या तीन आरोपींमध्ये सलीम रशिद शेख उर्फ संजय रत्नेश कांबळे उर्फ मामा उर्फ कुवइया वय ४२ वर्षे रा. रूम नं.४. पार्वती सदन बिल्डींग, गांवदेवी मैदान समोर, भुसार अली रोड, ठाणे, कळवा, आरोपी  इस्माईल सिराज खान रा. करवला चाळ साठे नगर समोर, मानखुर्द, आरोपी  बाबु उर्फ कांचा जमालुद्दीन खान रा. घाटकोपर, मुंबई याचे साथीने घरफोडी चोरी केल्याची माहीती दिली. या तीन आरोपीपैकी एक आरोपी आरोपी सलीम रशिद शेख उर्फ मामा उर्फ कुबडया याला वाकोला पोलिसांनी अटक केली होती. कायदेशीर प्रक्रिया करीत आरोपीचा ताबा घेण्यात आला. आरोपींच्या तपासामध्ये घरफोडी चोरी झालेल्या मालापैकी २,०२,४००/- रू. किं.चा सोने चांदीचे दागीने हस्तगत करून उत्कृष्ठ कामगीरी केली.  अटक तिन्ही आरोपींना न्यायालयात नेले असता ठाणे न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. 

COMMENTS