Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत गुरूपौर्णिमेनिमित्त साईनामाचा गजर

देश-विदेशातील भाविकांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

शिर्डी ःश्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी  राज्यातून व देशाच्या क

जी-20 चे प्रतिनिधित्व भारताच्या विकासाला बळकटी देणारे – प्रा. डॉ. हर्षा गोयल
आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा
जिल्ह्यात बाजारपेठा, आठवडेबाजार व धार्मिक स्थळांसह विवाहांवरील बंदी का

शिर्डी ःश्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी  राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गोव्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 05.15 वाजता श्रींची काकड आरती झाली. काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व इंग्लिश मिडीअम स्कुलचे प्रचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 06.20 वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी 07.00 वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्त अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी 8.00 वाजता लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.  गोव्यासह राज्यातील विविध ठिकाणाहुन आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली. सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम झाला. दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी 01.00 ते दुपारी 03.00 या वेळेत संजीव कुमार, पुणे यांचा भजनसंध्या  कार्यक्रम,  सायंकाळी 04.00 ते 06.00 या वेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी 07.00 वाजता श्रींची धुपारती होईल. 7.30 ते रात्रौ 10.00 यावेळेत श्री नीरज शर्मा, दिल्ली यांचा भजन संध्याचा कार्यक्रम, रात्रौ 09.15 वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई भक्तांना शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे याकरीता श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साई आश्रम (1000 रुम) भक्तनिवास येथे 10 लाख रुपये किमतीचे देणगी स्वरुपात आलेल्या नविन अत्याधुनिक वॉटर प्युरीफायर प्लांटचे संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व देणगीदार साईभक्त अरुण तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई, मॅकेनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ, साई आश्रम भक्तनिवास विभागाचे प्र. अधिक्षक विजय वाणी आदी उपस्थित होते.

COMMENTS