Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशंकर विद्यालय रवंदे येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील शिवशंकर विद्यालय रवंदे येथे शासकीय बालचित्र कला स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेसाठी केंद्रातील विविध शा

शारदा ज्युनिअर कॉलेजचा निकाल 87.18%
कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी घासली व धुतली भांडी ; क्रांती असंघटित कामगार संघटनेचे आंदोलन
बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील शिवशंकर विद्यालय रवंदे येथे शासकीय बालचित्र कला स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेसाठी केंद्रातील विविध शाळेतून 215 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता विद्यार्थ्यांनी मुक्तपणे चित्र काढण्याचा व रंगविण्याचा आनंद लुटला वयोगटानुसार विद्यार्थ्यांचे अ ब क ड असे गट करण्यात आले होते. बगीच्या, वाढदिवस, भातुकलीचा खेळ, माझा आवडता ऋतू, सर्कस, गडावरील सहल, भारतीय सण असे वेगवेगळे विषय घेऊन बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी छान चित्रे काढून रंगकाम केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब बिरे यांनी स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे नियोजन केले स्पर्धेसाठी  संदीप गवळी, संतोष तांदळे  सोमनाथ मंडाळकर यांनी परिश्रम घेतले यावेळी  शशिकांत जेजुरकर श्रीमती कविता कुमावत श्रीमती भाग्यश्री गिरी श्रीमती जया खैरे श्रीम शीतल मोरे श्रीमती बेबी कराळे  लतीफ पठाण शरद शिरसाट आदी शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रथमच केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या शिवशंकर विद्यालयात आनंदात स्पर्धा संपन्न झाली.

COMMENTS