Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः मानवी संस्कृती ही समर्पित आणि प्रामाणिक सेवेतून दृढ झाली असून ग्रामीण, दुर्लक्षित भागातील अनाथांची बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची खरी

अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे आहेत ः डॉ. बाबुराव उपाध्ये
आई ज्याला कळली तो खरा भाग्यवान ः डॉ. बाबुराव उपाध्ये
जेथे पुस्तक तेथे भारी मस्तक ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः मानवी संस्कृती ही समर्पित आणि प्रामाणिक सेवेतून दृढ झाली असून ग्रामीण, दुर्लक्षित भागातील अनाथांची बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची खरी तीर्थस्थळे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. परमपूज्य गुरुवर्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज बाबाजींच्या कृपाशीर्वादाने श्रीसाई विठ्ठल अनाथ आश्रम श्रीरामपूरतर्फे खैरी निमगाव चितळी माळरानावर असलेल्या जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासलगावद्वारा 10 मे ते 31 मे2024 या कालावधित आयोगित भव्य बाल संस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.
श्रीरामपूर येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव सुखदेव सुकळे यांनी बालकांसाठी धनादेश स्वरूपात देणगी आणि खाद्य पदार्थ तसेच संस्कार पुस्तकांची भेट देण्यात दिली.  आयोजक, समाजप्रबोधनकार ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी बालसंस्कार शिबिराची सविस्तर माहिती देऊन यासाठी अनाथांसाठी अशी देणगी देणारी माणसे देवरूपच असतात. संस्कारी आणि सेवाभावी, सुबोध बुरकुले यांचे जीवन आदर्शवत असल्याचे सांगितले. त्यांचे वडील बाळासाहेब बुरकुले आणि आई उज्ज्वला बुरकुले यांनीही भरभरून देणगी आणि खाऊ दिल्याबद्द्ल आनंद व्यक्त केला. आश्रमातर्फे प.पू. गुरुवर्य वासुदेव नंदगिरी यांनी सर्वांचा सत्कार करून आजच्या अनाथांसाठी नाथ होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.2003 पासून या आश्रमातील सेवाकार्यातून शेकडो विद्यार्थी डॉक्टर आणि विविध उच्च पदावर कार्यरत झाले आहेत. सुखदेव सुकळेसर यांनी या शिबिराच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.अशा सेवाभावी कार्यास हातभार लावणे हीच खरी देवपूजा असल्याचे सांगितले. राष्ट्र घडायचे असेल तर बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या कार्यासाठी हातभार लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आश्रमातील मुलांसाठी पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती वाढली तर हीच अनाथ मुले देशाची सेवाशक्ती बनतील, अनाथांसाठी समर्पित झालेले ह.भ.प. कृष्णानंद महाराज म्हणजे आजचे साई, विठ्ठलरूपच आहेत. शेकडो मुलांना नरक यातनातून त्यांनी बाहेर काढले. अनंत अडचणीवर मात केली. त्यांचे देवकार्य पुढे गेले पाहिजे. प.पू. स्वामी वासुदेव नंदगिरी हे1920 च्या जन्मापासून सदगुरू साई, जनार्दन स्वामीसेवेशी भक्तीनात्याने बांधले आहेत. या अध्यात्म कार्यात ते सहभागी आहेत.अगोदर ते सी.आय.डी होते. शिर्डीच्या कोते पाटील कुटुंबातील संस्कार त्यांना लाभले.104 वर्षाचे त्यांचे आजचे जीवन देतो तो देव स्वरूपाचे झाले आहे. आजही त्यांनी अनाथांना संगीत आणि अध्यात्मज्ञान देण्यात पुढाकार घेतला असल्याबद्दल कौतुक केले. या शिबिरात दररोज सर्व प्रकारचे अध्यात्म, आरोग्य, श्रम व संगीत शिक्षण दिले जाते. ह.भ.प. खंडेराव भागवतगुरुजी आणि अनेक भक्तपरिवार यात सहभागी आहेत. ह.भ.प. दिलीप गुंजाळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली आढाव, ह.भ.प. कृष्णा महाराज कांबळे, ह.भ.प. किरण महाराज हारळे, ह.भ.प. रावसाहेब महाराज वेताळ, सोमनाथ पेंटर यादव, पांडुरग भागवतगुरुजी, व्यवस्थापिका सौ. निकिता ज्ञानेश्‍वर आढाव, गयाबाई झाल्टे, संगीता सालपुरे अशा अनेकांच्या सहकार्यातून हे शिबीर सुरु असून सुकळे आणि बुरकुले परिवाराने शिबिरार्थी मुलांना देणगी आणि भरपूर खाऊ दिल्याबद्द्ल विशेष कौतुक केले. सेवाभावी व्यक्ती, संस्था यांनी या मानवसेवा कार्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करून ह.भ.प.कृष्णानंद महाराज यांनी आभार मानले.

COMMENTS