अहिल्यानगर : खरंतर यश ही कुणाची मक्तेदारी नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आणि सर्वसामान्यांचे, कष्टकर्य



अहिल्यानगर : खरंतर यश ही कुणाची मक्तेदारी नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आणि सर्वसामान्यांचे, कष्टकर्यांचे मुलं आपल्या कवेत आकाश घेतांना दिसून येत आहे. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल लागला आणि एक कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील मेेंढपाळाचा मुलगा बिरदेव ढोणे आयपीएस झाला, तर दुसरीकडे तर दुसरीकडे यतवमाळ जिल्ह्यातील अदिबा राज्यातील पहिली मुस्लिम महिला आयएएस होण्याचा मान मिळवला. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील डॉ. अक्षय मुंडे या तरूणाने घरात अठराविश्व दारिद्रय असतांना गगनझेप घेत यश मिळवले. खरंतर ही निवडक काही उदाहरणे. घरची परिस्थिती बेताची असतांना देखील, हार न मानता या तरूणांनी परिस्थितीशी, व्यवस्थेशी संघर्ष करत एक उंची गाठली ती आपल्या यशातून.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने परिस्थिीपुढे न झुकता अभ्यासात सातत्य ठेवले. अनेकांनी मदतीचे हात दिले, तर अनेकांनी मार्गदर्शन केले. मात्र बिरदेव या संपूर्ण परिस्थितीत मात करत अभ्यास करत राहिला, आणि आज आयपीएस झाला. बिरदेव याचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. खरंतर मेंढपाळ असल्यामुळे हक्काचा असा एकेठिकाणी निवारा नाही, सतत भटकंती अशा परिस्थितीत अभ्यास करायला वीज नाही, तरीही त्याने अभ्यास सोडले नाही, शिवाय आपले ध्येय देखील सोडले नाही. बिरदेव हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. दहावीत 96 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात त्याने प्रथम क्रमांक मिळवला आणि बारावीत 89 टक्के गुणांसह विज्ञान शाखेत यश मिळवले. पुढे त्याने पुण्यातून प्रतिष्ठित सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने अभ्यासाला सुरूवात केली आणि यश मिळवले. विशेष म्हणजे निकाल लागला त्यादिवशी तो मेंढ्याजवळ होता. अनेकांचे शुभेच्छासंदेश येत होते, अनेक जण भेटायला येत होते, मात्र कोणताही अभिनिवेश न बाळगता हा तरूण आपल्या मेंढ्यांची काळजी घेत होता, त्यांची राखण करत होता, त्यांना चारायला घेवून जात होता. पदोपदी संघर्ष आणि निखारे असतांना या तरूणाने आपल्या संघर्षावरून पाठ फिरवली नाही, त्याचेच यश आज त्याला मिळतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे घरात अठराविश्व दारिद्रय, आई इंदूबाई मुंडे निरक्षर असून शेतात कष्ट करतात, अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील पांगरी (गोपीनाथ गड) येथील डॉ. अक्षय संभाजीराव मुंडे यांनी यूपीएससी परिक्षेत 699 वी रँक मिळवली. अक्षयचे शिक्षण स्थानिक संत भगवान बाबा विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावी झाले. पुढे अकरावी-बारावी परळी येथील न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये, तर बीडीएसचे शिक्षण लातूरमधील एमआयटी कॉलेजमध्ये घेतले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने पुण्यात काही काळ क्लास लावले आणि नंतर थेट नवी दिल्ली गाठून तयारी सुरू ठेवली. अखेर अथक परिश्रमाच्या जोरावर अक्षयने हे यश मिळवले.
अदिबा मुस्लिम समाजातील पहिली महिला आयएएस
खरंतर ज्या समाजात मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवणे जिकिरीचे समजले जाते, त्याच मुस्लिम समाजातील अदिबा अनम अशफाक या तरूणीने कष्ट आणि सातत्याच्या जोरावर आयएएस होण्याचा मान मिळवला. रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी आपल्या मुलींच्या अभ्यासात कोणतीही कमकरता राहू नये, यासाठी काळजी घेतली. तर अदिबाने देखील त्या कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास करत यूपीएसीच्या परीक्षेत देशातून 142 वी रँक मिळवली. त्यामुळे तिला आयएएस रँक मिळणार यात शंका नाही. यासोबतच तिने आपल्या मुस्लिम समाजातील मुलींसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
COMMENTS