Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंघोळी करताना विजेचा धक्का बसून बालकाचा मृत्यू

औंध / वार्ताहर : औंध येथील करांडेवाडी नजीकच्या यादव मळ्यातील राहत्या घरातील बाथरुममध्ये सकाळी अंघोळ करत असताना विजेचा शॉक लागल्याने पियुष सुनिल य

बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘त्या’ योजनेचा लाभ
ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला शेतकर्‍यांच्या लुटीसाठी; 1 डिसेंबरला राजारामबापू कारखान्यात काटा बंद आंदोलन
श्रीं च्या पादुकासह प्रतिमेची ग्रामप्रदक्षणा

औंध / वार्ताहर : औंध येथील करांडेवाडी नजीकच्या यादव मळ्यातील राहत्या घरातील बाथरुममध्ये सकाळी अंघोळ करत असताना विजेचा शॉक लागल्याने पियुष सुनिल यादव (वय 12) या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत औंध पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, औंध येथील करांडेवाडी रस्त्याला असलेल्या यादव मळ्यात रहात असलेल्या सुनील सावता यादव यांचा मुलगा पियुष यादव हा राहत्या घरात सकाळी अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेला होता. बाथरूममधील वायरचा शॉक लागल्याने पियुषला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला कुटुंबियांनी तत्काळ औंध ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत सुनील यादव यांनी औंध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील अधिक तपास करत आहेत. पियुष हा औंध येथील श्री. श्री. विद्यालयात शिकत होता. तो नुकताच सातवी उत्तीर्ण होऊन आठवीच्या वर्गात गेला होता. अतिशय शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचा पियुष हुशार आणि शिक्षकप्रिय होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS