Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिखलठणवाडीला मिळाले हक्काचे डाक कार्यालय

श्रीगोंदे : तालुक्यातील चिखलठाणवाडी येथे नुकतेच नवीन डाक कार्यालय चालू झाले. त्याचे उद्घाटन अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी. नंदा व कर्जत

खड्ड्यांना हार घालून गांधीगिरी ; युवक काँग्रेसचे आंदोलन
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणादायी

श्रीगोंदे : तालुक्यातील चिखलठाणवाडी येथे नुकतेच नवीन डाक कार्यालय चालू झाले. त्याचे उद्घाटन अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी. नंदा व कर्जत उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख, पोस्ट बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
चिखलठाणवाडी या नवीन डाक कार्यालयाचा पिनकोड 413726 हा असणार आहे. यापूर्वी चिखलठाणवाडी गावाचा डाक विभागाचा व्यवहार लिंपणगाव 413726 या शाखा डाकघरा अंतर्गत चालायचा. चिखलठाणवाडी येथे नवीन डाक कार्यालय झाल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील सिद्धिविनायक गणपतीचे सिद्धटेक येथे नवीन पोस्ट ऑफिस चालू झाले होते. एक महिन्यातच कर्जत उपविभागात हे दुसरे पोस्ट ऑफिस चिकलठाणवाडी येथे चालु झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी संतोष घागरे, पोस्टमास्तर किरण शिंदे, सुनिल धस,दिगंबर सोनवणे, भीमराज गिरमकर, किरण कुरुमकर, बापूराव कांबळे, संतोष शिंदे, ऋषिकेश बोराडे, नि रोहिणी राऊत, आकांक्षा साळुंखे, अमिशा खेडकर, मोहिनी धनवे, पाराजी दरेकर आदी उपस्थित होते. संतोष शिंदे यांनी चिखलठाणबाडी येथील प्रथम शाखा डाकपाल म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारला. सूत्रसंचालन बापूराव कांबळे यांनी केले. प्रास्ताविक किरण कुरुमकर यांनी, तर आभार भीमराज गिरमकर यांनी मानले. चिखलठाणवाडी परिसरातील ग्रामस्थांनी या नवीनं डाक कार्यालय मार्फत मिळणार्‍या सर्व डाक सेवांचा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी केले.भारत सरकारच्या डाक विभागाअंतर्गत विविध योजना व सेवा ग्रामस्थांसाठी आहेत. कार्यालयीन दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत विविध डाक सेवांचा लाभ पात्र ग्राहकांना चिखलठाणवाडी या नवीन डाकघरामध्ये घेता येईल.असे वरिष्ठ डाक अधीक्षक बी. नंदा यांनी सांगितले.

COMMENTS