Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना सुनावलेले

छ. राजर्षी शाहू को-ऑपरेटिव्ह बँकेत शाहू महाराजांना अभिवादन
विद्युत भवनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
नयनतारा-विग्नेश अडकणार लग्न बंधनात ! | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना सुनावलेले खडेबोल यानंतर सोमवारी राज्यात सावरकरांच्या मुद्दयावरून राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाकरे गटावर जोरदार टीका  राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण सर्वांना माहितच आहे. सावरकर गौरव यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यातील शहरा शहरात काढली जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचे म्हणत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.  राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे. मात्र ते तसे करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे. ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर यांनी केला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. रविवारच्या सभेत वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याला थोबाडीत मारणार का? तुम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? ते तरी सांगा असाही प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

गांधींच्या थोबाडात मारणार का?
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान करणार्‍या मणिशंकर अय्यरच्या कानशिलात लगावली होती. आता उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार आहेत का?, सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, त्यांच्या संघर्षामुळेच देश स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. परंतु त्याचा काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपमान केला जात आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत आहे. त्यामुळे हिंदुत्व सोडले नाही असे म्हणणार्‍या एकाही नेत्यानं विधानसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं म्हणणारे अनेक नेते विधानसभेच्या अधिवेशनात मूग गिळून गप्प होते. कशासाठी तर राजकारण आणि महाविकास आघाडीसाठी? असा सवाल देखील शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.  

त्यांच्या भाषणातच सावरकर, कृतीत नाहीः फडणवीस – सत्येला लाथ मारण्याची ताकद उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांच्या भाषणातच फक्त सावरकर आहेत, कृतीमध्ये सावरकर नाही असे टीकास्त्र सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. विधान भवनात उद्धव ठाकरे आणि फडणवीस सोबत चालत आले होते यावर फडणवीस म्हणाले, माझ्यासोबत ते चालत आल्याने असे घडत असेल तर मी रोज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या लोकांना दरवाजापासून विधानभवनापर्यंत सोबत चालत नेईल म्हणजे ते सर्व सावरकरांचा जयजयकार करतील, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

COMMENTS