Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईचं प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतील वाढते प्रदूषण, मुंबईतील स्वच्छता याबाबत मुंबई महानगर पालिकेकडून काय उपाययोजना करण्यात आली आहे. याची प्रत्यक्ष पाहण

राज्यात 2 लाख 76 हजार कोटींची गुंतवणूक
संथ मतदानाची होणार चौकशी
आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील वाढते प्रदूषण, मुंबईतील स्वच्छता याबाबत मुंबई महानगर पालिकेकडून काय उपाययोजना करण्यात आली आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पहाटे ५ वाजल्यापासून मुंबईत विविध ठिकाणी भेट देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घराजवळूनच पाहणीला सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील होते.

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांमध्ये खालवल्याचे दिसून आले. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे उच्च न्यायालायाने देखील राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर आता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात मुंबई शहरातील रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याचे काम सुरु झाले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच वाजताच रस्त्यावर उतरले. यावेळी पाहणी करताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रदूषणाचं प्रमाण वाढलं होतं. मी पालिका कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रस्ते पाण्याने धुवावेत, डस्ट पूर्ण काढावी हवेतील धुलीकन फॉगरने कमी करावेत. सक्शन मशीन आपण लावलेली आहे. १ हजार टॅकर भाड्याने घेऊन रस्ते व फुटपाथ पाण्याने धुतले जात आहेत. तर प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल यासाठी संपुर्ण प्रयत्न सुरू असल्याचे देखील यावेळी शिंदे म्हणालेत

COMMENTS